भारताचा माजी कर्णधार आता क्रिकेटच्या आपल्या अंतिम चरणी येऊन पोहचला आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषकनांतर आता एम एस धोनी (MS Dhoni) च्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. धोनी किंवा बीसीसीआय (BCCI) अधिकाराने यावर अजून कोणतेही भाष्य केला नाही पण पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक नांतर धोनी निवृत्त होईल असे म्हटले जात आहे. पण धोनीच्या निवृत्तीने दोन प्रश्न निम्हण होतात- एक म्हणजे संघात त्याची जागा कोण घेणार आणि दुसरा म्हणजे त्याचा जर्सी नंबर 7 कोणाला मिळणार? आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) पहिल्यांदा टेस्ट क्रिकेटमधील पांढऱ्या जर्सीवर खेळाडूचे नाव आणि नंबर देखील लिहिले जातील. त्यामुळे टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज विरुद्ध टेस्ट मालिकेमध्ये नंबर 7 ची जर्सी कोणी परिधान करेल का यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. (Throwback: ...जेव्हा एमएस धोनी च्या उदार व्यक्तिमत्वावर फिदा झाली पाकिस्तानी अभिनेत्री Mathira Khan, जाणून घ्या काय आहे किस्सा)
बीसीसीआयने याआधीच मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची जर्सी नंबर 10 अधिकृतपणे निवृत्त केली होती. सचिनच्या निवृत्तीनंतर जलद गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) ने 10 नंबरची जर्सी घातली होती तेव्हा सोशल मीडियावर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे धोनीबद्दल बीसीसीआय घेते याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आगामी विंडीज टेस्ट मालिकांसाठी कर्णधार विराट कोहली 18 नंबरची तर रोहित शर्मा 45 नंबरची जर्सी घालेल. आणि अन्य खेळाडू वनेड आणि टी-20मधील त्यांच्या नंबरची जर्सी वापरतील. धोनीने टेस्ट क्रिकेटमधून 2015 मध्येच निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे जर्सी नंबर 7 उपलब्ध असेल. पण संघातील अन्य कोणताही खेळाडू या क्रमांकाची जर्सी वापरण्याची शक्यता कमीच आहे.
सर्व साधारणपणे क्रिकेटमध्ये जर्सीला निवृत्त केले जात नाही. पण बीसीसीआयने सचिन बाबत तसा निर्णय घेतला होता. आणि आता धोनीचे क्रिकेटमधील योगदान पाहता बीसीसीआय त्याचा जर्सी नंबर 7 देखील निवृत्त करू शकते.