ICC Team of The Decade: आयसीसीकडून (ICC) 27 डिसेंबर रोजी दशकातील सर्वोत्कृष्ट टी-20 संघ (T20 Team of The Decade) जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये देश-विदेशातील अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश झाला आहे तथापि, या यादीमध्ये काही खेळाडू असे आहेत मागे राहिले आणि ज्यांचा सामील होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. आयसीसीच्या दशकातील सर्वोत्तम टी-20 यादीतून कुठेतरी क्रिकेटप्रेमींची निराश झाली आहे. कारण 'त्या' पाच खेळाडूंना यावेळी यादीत स्थान मिळवता आले नाही, ज्यांच्या नावाची सर्वाधिक अपेक्षा केली जात होती. यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याच्यापासून पाकिस्तानचा नंबर-1 टी-20 फलंदाज बाबर आझमचा (Babar Azam) देखील समावेश आहे. विशेष म्हणजे, आयसीसीने जाहीर केलेल्या तीनही-टेस्ट, वनडे आणि टी-20, संघात एकही पाकिस्तानी खेळाडूला स्थान मिळवता आले नाही. (ICC Team of The Decade: 'ICC ने दशकची टी-20 नाही तर IPL टीम घोषित केली', बाबर आझमला स्थान न दिल्याने संतप्त शोएब अख्तरची प्रतिक्रिया)
असे काही खेळाडू आहेत ज्यांमा प्रभावी कामगिरी करूनही आयसीसीच्या दशकातील टी-20 दुर्दैवीपणे स्थान मिळवता आले नाही.
1. बाबर आझम (Babar Azam)
आयसीसीच्या दशकातील टी-20 यादीमध्ये पाकिस्तान संघाचा सध्याचा कर्णधार बाबर आझम स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. याबाबत सोशल मीडियावर अनेकांनी संताप देखील व्यक्त केला. 10 नोव्हेंबर 2020 रोजी बाबर आझमने झिम्बाब्वेविरुद्ध अंतिम टी-20 सामना खेळला होता. बाबरने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी-20 डेब्यू केले आणि आतापर्यंत 44 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 50.94 च्या शानदार सरासरीने 1681 धावा केल्या आहेत.
2. इयन मॉर्गन (Eoin Morgan)
इंग्लंडचा मर्यादित ओव्हरचा कर्णधार मॉर्गनला देखील आयसीसीच्या दशकातील टी-20 यादीतून बाहेर जाण्याचा मार्ग दाखवला गेला आहे. मॉर्गनने टी -20 स्वरूपात 97 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 25.44 च्या सरासरीने 1272 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 5 अर्धशतकांचाही समावेश आहे. या आकडेवारीनुसार मॉर्गन दशकाच्या टी-20 टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी पात्र होता, परंतु तसे झाले नाही.
3. केन विल्यमसन (Kane Williamson)
न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसन आजकाल शानदार फॉर्ममध्ये धावत आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या मालिकेत दोन सामने खेळत 58 धावा केल्या. पण आयसीसी दशकाच्या टी-20 यादीमधून त्याचे नावदेखील गायब आहे. त्याच्या उत्तम कामगिरीकडे पाहता विल्यमसनला या यादीत स्थान मिळविण्याचा अधिकार होता. किवी कर्णधाराने 62 टी-20 सामने खेळत 1723 धावा केल्या आहेत ज्यात 12 अर्धशतकांचा समावेश आहे. या सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या कर्णधाराने 39.49 च्या सरासरीने फलंदाजी केली आहे ज्यानुसार तो दशकातील टी-20 यादीमध्ये स्थान मिळविण्यास पात्र होता.
4. फाफ डु प्लेसिस (Faf du Plessis)
दक्षिण आफ्रिकेचा तुफान फलंदाज फाफ डू प्लेसिस आपल्या शानदार फलंदाजीसाठी क्रिकेट जगतात प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या कामगिरी क्रिकेट चाहत्यांनाही प्रभावित केले आहे पण, त्याचे नावही आयसीसीच्या दशकात टी -20 यादीतून वगळण्यात आले आहे. त्याने 50 डावात एकूण 15 28 धावा केल्या असून त्याने शानदार 32.98 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तथापि, चांगल्या धावा आणि सरासरीने फलंदाजी करूनही फाफ डू प्लेसिसला दशकातील टी-20 यादीमध्ये स्थान मिळाले नाही.
5. ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo)
वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होलाही आजच्या आयसीसी दशकात टी -20 यादीमधून वगळण्यात आले आहे. या स्वरूपात ड्वेन ब्राव्होने आतापर्यंत 71 टी029 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 22.58 च्या सरासरीने फलंदाजी करत 1115 धावा केल्या आहेत. ब्रावो टी-20मधील सर्वात घातक अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे आणि असे असतानाही त्याला आयसीसीच्या दशकाच्या टी-20 यादीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. परंतु त्याची आकडेवारी आधारे ब्रावो या यादीमध्ये स्थान मिळविण्यासाठी पात्र होता.
आयसीसीने जाहीर केलेल्या टी-20 संघात चार भारतीय खेळाडूंना सामील करण्यात आले असून माजी कर्णधार एमएस धोनीकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजचे प्रत्येकी 2 तर श्रीलंका आणि अफगाणिस्थानच्या प्रत्येकी एका खेळाडूला स्थान मिळाले आहे.