शोएब अख्तर (Photo Credit: ScreenGrab/YouTube)

ICC Team of The Decade: आयसीसीने (ICC) रविवार, 27 डिसेंबर रोजी दशकची टी-20, वनडे आणि कसोटी संघाची घोषणा केली. तीनही यादीत भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला तर पाकिस्तानच्या (Pakistan) एकाही खेळाडूला स्थान मिळवता आलं नाही. यामुळे, सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसीने दशकातील सर्वोत्तम खेळाडूंची निवड करण्यासाठी एका पोलचं आयोजन केलं होतं ज्यामुळे मिळालेल्या मतांच्या आधारावर तिन्ही प्रकारच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघामध्ये पाकिस्तानधील एकाही खेळाडूला स्थान मिळवता आलं नाही. सोशल मीडियावर चाहत्यांप्रमाणेच पाकिस्तानचे अनुभवी माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) देखील पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या (Babar Azam) दशकाच्या आयसीसी टी-20 संघात समावेश केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. 'रावळपिंडी एक्स्प्रेस' म्हणून प्रसिद्ध अख्तरने म्हटले की, "आयसीसीने आयपीएल (IPL) प्लेइंग-इलेव्हन जाहीर केले, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे आंतरराष्ट्रीय दशक संघ नाही." (ICC Team Of The Decade: आयसीसीकडून दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय, टी-20 आणि कसोटी संघाची घोषणा; भारतीय खेळाडूंकडे तिन्ही संघाचे नेतृत्व)

अख्तरने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, "मला वाटते पाकिस्तान आयसीसीचा सदस्य असल्याची आणि तो टी-20 क्रिकेट देखील खेळतो याची आयसीसीला विसर पडली आहे. त्यांनी सध्या आयसीसी टी-20 क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा फलंदाज असलेल्या बाबर आझमची निवड केली नाही. त्यांनी पाकिस्तानच्या एकाही खेळाडूची निवड केली नाही." ते पुढे म्हणाले, "आम्हाला तुमच्या (आयसीसी) आंतरराष्ट्रीय टी-20 संघाची (दशकात) गरज नाही कारण तुम्ही आयपीएल संघ जाहीर केला आहे, विश्व क्रिकेट संघाला नाही." अनुभवी वेगवान गोलंदाजाने आयसीसीच्या कारभारावर उघडपणे टीका केली आणि दावा केला की ही संस्था पैशासाठी हा खेळाचा नाश करत आहे.

दरम्यान, आयसीसीच्या दशकातील टी-20 संघात विराट कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनी यांचा समावेश झाला आहे. धोनीला आयसीसी आंतरराष्ट्रीय टी-20 च्या दशकातील संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. संघात भारताचे 4 खेळाडू, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजचे 2, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी 1 क्रिकेटपटूंचा समावेश आहे.