भारत विरुद्ध पाकिस्तान (Photo Credit: Getty)

ICC T20 World Cup 2021: आयसीसी टी-20 वर्ल्ड कपचे (T20 World Cup) 2021 च्या शेवटी (ऑक्टोबर-नोव्हेंबर) भारतात (India) आयोजन होणार आहे. यापूर्वीच, शेजारी देश पाकिस्तानने (Pakistan) त्यावर निर्बंध लादण्यास सुरवात केली आहे. आयसीसी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) खेळला जावा अशी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) अध्यक्ष एहसान मनी (Ehsan Mani) यांची मागणी केली आहे. पीसीबीच्या (PCB) म्हणण्यानुसार टी-20 स्पर्धेसाठी भारत, त्याचे संघ, चाहते आणि पत्रकार भारताकडून लेखी हमी देत जात नाही तोपर्यंत युएईमध्ये या स्पर्धेचे आयोजन करावे अशी मागणी ते करत राहतील. पाकिस्तान मंडळाने पुढे म्हटले आहे की त्यांनी मार्चपर्यंत भारताला लेखी आश्वासन देण्यास सांगितले होते आणि आता असे करण्यात भारत अपयशी ठरला आहे.  जर भारताकडून लेखी कोणतेही आश्वासन मिळाले नाही तर ते युएईमध्ये (UAE) टी-20 विश्वचषक आयोजित करण्याची मागणी करत राहतील. (2021 ICC T20 World Cup: 'हे' 6 दिग्गज खेळाडू निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे, टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर खेळाला करू शकतात रामराम)

“आयसीसीमध्ये बीग थ्री म्हणजेच भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन संघांना अधिक महत्त्व दिले जाते. ती विचारसरणी बदलली जायला हवी. भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी केवळ पाकिस्तानच्या खेळाडूंना नव्हे तर चाहते, अधिकारी आणि पत्रकारांनाही व्हिसा मंजूर केला जाईल असं लेखी हमीपत्र भारताने पाकिस्तानला द्यावे”, अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन एहसान मनी यांनी पीटीआयशी बोलताना केली. विशेष म्हणजे, 2016 टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन भारतात करण्यात आले होते. त्यावेळी पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा देण्यात आला होता पण, राजकीय वातावरण पाहता भारत-पाक सामना नियोजित स्थळावरून दुसरीकडे हलवण्यात आला होता. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मनी यांचा कार्यकाळ यंदा सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येणार आहे, परंतु त्यांना पुन्हा पीसीबीच्या पदावर कब्जा करायचा आहे. लाहोर येथे एका पत्रकारपरिषदेत ते म्हणाले की पंतप्रधान आणि मंडळाचे मुख्य संरक्षक इमरान खान यांनी आपला कार्यकाळ वाढवला तर ते या पदावर कायम राहण्यास तयार आहेत.

ते म्हणाले, “मी कधीही हे पद मागितले नाही किंवा मी पंतप्रधानांशी याबद्दल बोललो नाही. त्यांनी मला जबाबदारी दिली आणि मी ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला." ते पुढे म्हणाले की ते आपल्या कामानी समाधानी आहे. ते म्हणाले, "कोरोना महामारी असूनही पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन करवल्याचेआमचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांना श्रेय दिले जाते. मी त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढवू इच्छितो.”