टी-20 वर्ल्ड कप 2020 स्थगित होणार, ICC कडून पुढील आठवड्यात औपचारिक घोषणेची शक्यता
टी-20 वर्ल्ड कप (Photo Credit: Getty Images)

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) यंदा आयोजित होणारी टी-20 स्पर्धा स्थगित होण्याच्या मार्गावर आहे. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) कोरोना महामारीचा पुढील शिकार बनण्याच्या ठरत आहे कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) हा कार्यक्रम पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकवर बर्‍याच दिवसांपासून चर्चा होत आहे आणि आता याची अधिकृत घोषणाही पुढील आठवड्यात होऊ शकते. आयसीसी बोर्डाची बैठक 28 मे रोजी होणार आहे आणि टी-20 वर्ल्ड कपच्या भविष्याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मेगा इव्हेंटला पुढच्या वर्षापर्यंत ढकलण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. पुढील वर्षी टूर्नामेंट आयोजित करण्यासाठी 2021 आयसीसीकडे तीन मार्ग आहेत. लॉकडाउनमुळे यापूर्वी आयपीएल स्पर्धा तीन वेळा स्थगित करण्यात आली आहे. आणि टूर्नामेंट रद्द झाल्यास बोर्डाला 4000 कोटींचे नुकसान होऊ शकते. (IPL 2020: सप्टेंबर-नोव्हेंबर महिन्यात आयपीएलचे आयोजन करण्यास भारतीय बोर्ड उत्सुक, BCCI सूत्रांची माहिती)

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, करोनामुळे दर चार वर्षांनी आयोजित करण्यात येणारी ऑलिम्पिक स्पर्धादेखील आता 2020 ऐवजी 2021 मध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर आता टी-20 वर्ल्ड कप देखील पुढे ढकलण्याचा विचार केला जात असून आयसीसीकडून पुढील आठवड्यात याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वर्ल्ड कप स्थगित होण्यामागे आयपीएलला कारणीभूत ठरवले जात आहे. यंदा 16-संघ स्पर्धा आयोजित करणे ऑस्ट्रेलियासाठी खूपच जास्त आहे आणि म्हणूनच वर्ल्ड कप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुसरीकडे, स्पर्धा आयोजित करण्यासाठी असलेल्या तीन पर्यांपैकी पहिला, क्रिकेट ऑस्ट्रेलिया फेब्रुवारी-मार्च 2021 दरम्यान टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करू शकते. पण त्या काळात असलेला इंग्लंडचा भारत दौरा आणि त्यानंतर आयपीएल 2021 चे आयोजन करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत स्टार इंडियाला भारतातील देशांतील मालिकेच्या प्रसारणाचे हक्क आणि आयसीसी स्पर्धेच्या प्रसारणाचे हक्क अशा दोन्ही गोष्टी देण्यासाठी ब्रॉडकास्टर्स विरोध करू शकतात. दुसरा म्हणजे, 2021 टी-20 क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये 2021 वर्ल्ड कपचे यजमानपद ऑस्ट्रेलियाला देऊन 2022 चे टी-20 स्पर्धेचे यजमानपद भारत स्वत:कडे घेण्याचा पर्याय आहे. आणि तिसरा आणि अंतिम पर्याय म्हणजे, ऑस्ट्रेलियाने 2022 वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित करण्यावर विचार करावा. यामागील मुख्य कारण म्हणजे, आयसीसीने अद्याप 2022 मधील मोठ्या स्पर्धांच्या घोषणा केलेल्या नाहीत.