चाहत्यांना 2024 मध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा आणि मालिका पाहायला मिळणार आहे. टी-20 विश्वचषक (ICC T20I विश्वचषक 2024) देखील यावर्षी आयोजित केला जाणार आहे. त्याआधी दक्षिण आफ्रिकेत युवा क्रिकेटपटूंचा मेळा भरणार आहे. 19 जानेवारीपासून अंडर-19 वर्ल्ड कप (ICC U19 World Cup) होणार आहे. या विश्वचषकाबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आज मोठी घोषणा केली असून सामना अधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली आहे. 19 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसह एकूण 41 सामने खेळवले जाणार आहेत. आयसीसीच्या घोषणेनंतर आता ही माहिती समोर आली आहे की 16 पंच आणि 4 मॅच रेफरी संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहेत. या विश्वचषकाचा पहिला सामना 19 जानेवारी रोजी यजमान दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात पॉचेफस्ट्रूम येथे खेळवला जाईल.
पहिल्या सामन्यात मैदानावरील पंच आयर्लंडचा रोलँड ब्लॅक आणि बांगलादेशचा गाझी सोहेल असतील. या सामन्यात सामनाधिकारी श्रीलंकेचे ग्रॅमी लॅब्रो असतील. पाकिस्तानचा रशीद रियाझ वकार तिसऱ्या पंचाची भूमिका बजावणार आहे. चौथ्या पंचाची जबाबदारी अफगाणिस्तानच्या बिस्मिल्लाह जान सिनवारी यांच्याकडे असेल. (हे देखील वाचा: Iftikhar Ahmed Moye-Moye: बाबर आझमनंतर इफ्तिखार अहमदनेही सोडला सोपा झेल, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल)
या स्पर्धेच्या मॅच अधिकाऱ्यांची घोषणा करताना आयसीसीने सांगितले की, 'अंडर-19 विश्वचषक हा आयसीसी कॅलेंडरमधील अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. खेळाच्या भविष्यातील तारे शोधण्यासाठी हे एक व्यासपीठ मानले गेले आहे. या वर्षीही अनेक खेळाडूंसाठी ते असेच व्यासपीठ म्हणून काम करेल.
आयसीसी अंडर 19 विश्वचषक 2024 साठी सामना अधिकारी
आयसीसी अंडर 19 विश्वचषकासाठी पंच - बिस्मिल्लाह जान शिनवारी, डोनोव्हन कोच, फिल गिलेस्पी, गाझी सोहेल, मसुदुर रहमान मुकुल, माईक बर्न्स, केएनए पद्मनाभन, रोलँड ब्लॅक, फैसल खान आफ्रिदी, रशीद रियाझ वकार, अल्लाउद्दीन पालेकर, बोंगानी जेले, पॅट्रिक गस्टार्ड, निगेल डुगुइड, लँगटन रुसेरे, फोर्स्टर मुतिझ्वा.
आयसीसी अंडर 19 विश्वचषक स्पर्धेसाठी सामनाधिकारी - ग्रॅमी लॅब्रो, शाद वडवाला, नारायणन कुट्टी, वेन नून.