Photo Credit- X

Jay Shah Congratulates Virat Kohli: आयसीसी अध्यक्ष जय शाह (Jay Shah) यांनी भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीचे (Virat Kohli) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14000 धावा पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14000 धावा पूर्ण केल्या आणि असे करणारा तो तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. जय शाह यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल विराट कोहलीच्या कव्हर ड्राइव्हचे कौतुक केले. (Virat Kohli Completed Fastest 14000 ODI Runs: विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यात केल्या 14,000 धावा पूर्ण, सचिनचा विक्रम काढला मोडीत)

जय शाहांकडून विराट कोहलीचे अभिनंदन

पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर (463 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18,426 धावा), दुसऱ्या स्थानावर कुमार संगकारा (404 सामन्यांमध्ये 14,234 धावा) नंतर हा टप्पा गाठणारा विराट तिसरा फलंदाज आहे. 299 एकदिवसीय सामन्यांमध्ये, कोहलीने 58.20 च्या सरासरीने 14,085 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 51 शतके आणि 73 अर्धशतके आहेत.