रविचंद्रन अश्विन (Photo Credit: PTI)

ICC Awards 2021: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2021 च्या आयसीसी पुरुष कसोटी खेळाडू (ICC Men’s Test Player) पुरस्कारासाठी चार स्टार खेळाडूंच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये एक फलंदाज, एक फिरकीचा जादूगार, एक उदयोन्मुख वेगवान गोलंदाजी करणारा सुपरस्टार आणि एक कुशाग्र सलामीवीरचा समावेश झाला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या पुरुष कसोटीपटू 2021 च्या पुरस्कारासाठी इंग्लंड कर्णधार जो रूट (Joe Root), टीम इंडियाचा (Team India) स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin), न्यूझीलंडचा तडाखेबाज वेगवान गोलंदाज काईल जेमीसन (Kyle Jamieson) आणि श्रीलंकन दिमुथ करुणारत्ने यांचा नामांकन मिळाले आहे. ICC पुरस्कार 2021 गेल्या वर्षभरातील क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरी आणि पराक्रमांना मान्यता म्हणून दिले जातील.

दरम्यान आयसीसीने नामांकित केलेल्या या खेळाडूंच्या 2021 मधील कामगिरीबद्दल बोलायचे तर ब्रिटिश संघाचा कर्णधार रूटने यंदा 15 सामन्यात सहा शतकांसह एकूण 1708 धावा केल्या आहेत. या वर्षी एक हजार पेक्षा अधिक कसोटी धावा करणारा रूट एकमेव फलंदाज आहे. रुटने यंदा बॅटने जोरदार धावा लुटल्या आहेत, तर आर अश्विनने अर्धशतकही झळकावले आहे. जेमीसनने यावर्षी न्यूझीलंडसाठी चांगली कामगिरी केली आहे, तर दिमुथ करुणारत्नेची श्रीलंकेसाठी सलामीला येते आश्चर्यकारक कामगिरी राहिली आहे. टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू अश्विनबद्दल बोलायचे तर त्याने या वर्षी 8 सामन्यात 16.23 च्या सरासरीने 52 विकेट आणि एका शतकासह 28.08 च्या वेगाने 337 धावा केल्या आहेत. मायदेशात कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या विजयात अश्विनने निर्णायक भूमिका बजावली आहे.

दरम्यान यंदाच्या आयसीसी पुरस्कारांमध्ये एकूण 13 वैयक्तिक पुरस्कारांचा समावेश असेल. याशिवाय पुरुष आणि महिला क्रिकेटमधील प्रत्येक फॉरमॅटसाठी वर्षातील पाच संघांची घोषणा केली जाईल. जागतिक क्रिकेट पत्रकार आणि प्रसारकांच्या विस्तृत निवडीचा समावेश असलेली व्होटिंग अकादमी प्रत्येक श्रेणीसाठी त्यांच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या निवडीसाठी मतदान करतील. तसेच आयसीसीच्या डिजिटल माध्यमातून चाहत्यांच्या मतांचाही विचार केला जाईल. प्रत्येक श्रेणीतील विजेते जानेवारीमध्ये घोषित केले जातील. 17 आणि 18 जानेवारीला अधिकृत ICC टीम ऑफ द इयर जाहीर होईल. महिला क्रिकेटशी संबंधित वैयक्तिक पुरस्कारांची घोषणा 23 जानेवारीला होईल. तर 24 जानेवारी रोजी पुरुष पुरस्कार तसेच स्पिरिट ऑफ क्रिकेट आणि अंपायर ऑफ द इयर पुरस्कार जाहीर केले जातील.