IND vs NZ, ICC CWC 2019 Semi-Final: एम एस धोनी च्या सिक्स वर सौरव गांगुली आणि इयान स्मिथची कॉमेंट्री बघून तुमच्याही अंगावर शहारे येतील, पहा हा रोमांचक (Video)
इयान स्मिथ आणि सौरव गांगुली (Image Credit: Video Grab)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमधील पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघाचा पराभव चाहते आणि संपूर्ण क्रिकेटविश्वासाठी धक्कादायक होता. न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताच्या शंभर धावा तरी होतील का अशी शंका वाटत असताना अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि माजी कर्णधार महेंद्र सिंघ धोनी (Mahendra Singh Dhoni) यांनी शानदार खेळी करत भारताच्या आशा उंचवल्या होत्या. सातव्या विकेटसाठी जडेजा-धोनी यांनी शतकी भागिदारी केली. सर्वांच्या नजरा होत्या त्या धोनीवर. पण धोनी धावचीत झाला आणि भारताचा पराभव निश्चित झाला. (IND vs NZ, ICC CWC 2019 Semi-Final: टीम इंडियाच्या पराभवानंतर एडम गिलक्रिस्ट ने केले धोनी चे समर्थन, Tweet वाचून फॅन्स होतील खुश)

पण धोनी बाद होण्याआधी त्याने लॉकी फर्ग्यूसन (Lockie Ferguson) या किवी गोलंदाजाच्या एका चेंडूवर ऑफ-साईडला षटकार मारला आणि तो बघून कॉमेंट्री करणारे इयान स्मिथ (Ian Smith) आणि सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांचा उत्साह बघण्यासारखा होता. स्मिथ म्हणाले, 'जात आहे, जात आहे, गेला'. सिक्स गेलेला पाहून गांगुलीने तर आपल्या खुर्चीवरून उडीच मारली. पण लगेच धोनी धावचीत झाला आणि कॉमेंट्री करणारे स्मिथ-गांगुली देखील निराश झालेले दिसले. धोनीच्या विकेटबद्दल स्मिथ म्हणाला, 'आपण क्रिकेटच्या या महान खेळाडूला अंतिम वेळी पहिले आहे का?' स्मिथ आणि गांगुलीची अशी कॉमेंट्री पाहून तुमच्या अंगावर देखील शहरे येतील. पहा हा व्हिडिओ:

भारत-न्यूझीलंड यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या 11 चेंडूत भारताला 25 धावांची गरज होती. 49व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर धोनीने एक धाव घेतली दुसऱी धाव घेण्याचा प्रयत्न करताना धोनी 50 धावांवर धावबाद झाला. धोनी बाद झाल्याने टीम इंडियाचे आणि कोट्यवधी भारतीय चाहत्यांचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले.