
Rajiv Gandhi Stadium Stands Controversy: हैदराबाद क्रिकेट पुन्हा एकदा वादात सापडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला (HCA) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील स्टँडवरून माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन हे नाव काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय एचसीएचे नीतिमत्ता अधिकारी आणि लोकपाल न्यायमूर्ती व्ही. ईश्वरय्या यांनी दिला आहे. स्टेडियमच्या नॉर्थ पॅव्हेलियन (Mohammad Azharuddin Stand) स्टँडचे नाव पूर्वी 'व्हीव्हीएस लक्ष्मण पॅव्हेलियन' (VVS Laxman Pavilion) होते. जे 2019 मध्ये अझरुद्दीन एचसीए अध्यक्ष असताना 'मोहम्मद अझरुद्दीन स्टँड' असे बदलण्यात आले.
परंतु लॉर्ड्स क्रिकेट क्लबच्या खजिनदार सोमना मिश्रा यांनी दाखल केलेल्या याचिकेत ते कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रेसट असे सांगत या प्रकरणाचे वर्णन करण्यात आले. याचिकेत एचसीएच्या मेमोरँडम ऑफ असोसिएशनच्या नियम 38 चा उल्लेख करण्यात आला आहे. जो कोणत्याही सदस्याला त्याच्या वैयक्तिक हितासाठी निर्णय घेण्यास मनाई करतो.
HCA Orders Removal of Azharuddin’s Name from Stadium Stand
Ethics Officer Finds Conflict of Interest in Naming Decision
The Hyderabad Cricket Association’s (HCA) Ethics Officer and Ombudsman, Justice V. Eswaraiah (Retd), has directed the removal of Mohammed Azharuddin’s name… pic.twitter.com/CpE4HVXjeE
— Sudhakar Udumula (@sudhakarudumula) April 19, 2025
क्रिकबझच्या माहितीनुसार, लोकपालने त्यांच्या निर्णयात म्हटले आहे की, "हे कृत्य म्हणजे नियमांचे उलंघन आहे आणि त्यात सुधारणा केलेली नाही. यावरून हे स्पष्ट होते की प्रतिवादी क्रमांक 1 (अझरुद्दीन) यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून स्वतःचा फायदा करण्याचा प्रयत्न केला आहे. या आधारावर, संघर्ष आणखी वाढेल हे स्पष्ट होईल. तसेच अझरुद्दीनचे नाव तात्काळ काढून टाकावे आणि या नावाने तिकिटे छापणे बंद करावे", असे आदेश दिले.