India vs Sri Lanka Schedule 2024

मुंबई: एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंकेत (Sri Lanka) पोहोचला आहे. भारताचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) या मालिकेतून आपली जबाबदारी स्वीकारताना दिसणार आहेत. या दौऱ्यात भारताला तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. त्यामुळे तेवढ्याच सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाईल. या मालिकेचे थेट प्रक्षेपण तुम्ही टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहू शकता? (हे देखील वाचा: IND vs SL T20I Series 2024: टी-20 मालिकेत टीम इंडियाच्या 'या' महान खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा, जाणून कोण आहे ते...)

कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर टीव्हीवर पाहू शकता. जर तुम्हाला या मालिकेचे सामने मोबाईलवर पहायचे असतील तर तुम्ही ते सोनी लाईव्ह ॲपवर पाहू शकता. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये चाहत्यांना या मालिकेचा आनंद घेता येईल. मात्र, मोबाईलवर सामना पाहण्यासाठी चाहत्यांना सोनी लाईव्हचे सदस्यत्व घ्यावे लागेल. या सर्वांशिवाय तुम्ही टीव्हीवर डीडी नॅशनलवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिका सामना देखील अनुभवू शकता.

टी-20 सामन्याचे वेळापत्रक

पहिला टी-20 सामना, 27 जुलै 2024, पल्लेकेले, संध्याकाळी 7 वाजता (भारतीय वेळेनुसार)

दुसरा टी-20 सामना, 28 जुलै 2024, पल्लेकेले, संध्याकाळी 7 वाजता

तिसरा टी-20 सामना, 30 जुलै 2024, पल्लेकेले, संध्याकाळी 7 वाजता

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी-20 संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रवी बिश्रणोई. अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज