How to Download Hotstar & Watch RCB vs RR Live Match: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स (Photo Credit: PTI)

RCB vs RR IPL Match 2020: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 च्या 15 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) शनिवारी राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) सामना होईल. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन्ही संघांच्या कामगिरीबद्दल बोलायचे तर दोन्ही संघांनी अनुक्रमे तीन सामने खेळले आहेत. या तीन सामन्यात दोन्ही संघांनी अनुक्रमे दोन जिंकले आणि प्रत्येकी एक सामना गमावला आहे. राजस्थानचा संघ 4 (-0.219) गुणांसह पाचव्या स्थानावर आहे तर विराट कोहलीच्या नेतृत्वातील बेंगलोर संघ 4 (-1.450) गुणांसह सहाव्या स्थानी आहे. आजच्या सामन्यातून एकीकडे विराटचा संघ आपला विजयी रथ कायम ठेवू इच्छित असेल, तर स्मिथच्या नेतृत्वातील रॉयल्स विजयी रथावर परतण्याचा प्रयत्न करतील. बेंगलोरने मुंबई इंडियन्सविरुद्ध मागील सामन्यात थरारक विजय मिळवला होता. दोन्ही टीममधील सामना बरोबरीत सुटल्याने अखेर बेंगलोरने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला होता. दुसरीकडे, राजस्थानची फलंदाजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध निरुत्तर ठरली. (RCB vs RR, IPL 2020: स्टिव्ह स्मिथने टॉस जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, पाहा बेंगलोर-राजस्थानचे प्लेइंग इलेव्हन)

कोरोना व्हायरसमुळे यंदा आयपीएलचा 13वा हंगाम भारताऐवजी युएईमध्ये खेळला जात आहे. जर आपणास काही कारणास्तव टीव्हीवर आयपीएलचा आनंद घेता येत नसेल तर आपण डिस्नी+ हॉटस्टारवर आयपीएलची मजा घेऊ शकता. डिस्नी+ हॉटस्टारवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आजचा सामना आपण पाहू शकता. हा सामना दुपारी 3.30 वाजेपासून लाईव्ह प्रक्षेपित केला जाईल. हा सामना अबू धाबीच्या (Abu Dhabi) शेख झायेद स्टेडियमवर दिवसा खेळला जाईल.

आपल्या मोबाइल फोनमध्ये हॉटस्टार डाउनलोड कसे करावे:

1. मोबाइलमध्ये हॉटस्टार डाउनलोड करणे खूप सोपे आहे. पहिले आपल्या मोबाइलच्या प्ले-स्टोअरवर जा आणि तेथे हॉटस्टार शोधा.

2. नंतर इन्स्टॉल ऑप्शनवर जा आणि आपल्या फोनमध्ये अ‍ॅप इन्स्टॉल करा.

3. इन्स्टॉल केल्यानंतर, आपल्या अ‍ॅप्स मेनूमध्ये किंवा मुख्यपृष्ठावर आपल्याला हॉटस्टार अ‍ॅप चिन्ह दिसेल.

4. यानंतर आपण आपल्या जीमेल किंवा फेसबुक अकाउंटवरून साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन अ‍ॅप उघडू शकता.

5. साइन इन होताच आपण लाईव्ह व्हिडिओ, क्रीडा टूर्नामेंट जसे की आयपीएल, टीव्ही मालिका, चित्रपट आणि बरेच काही हॉटस्टार वर पाहू शकता.

हिंदी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा बर्‍याच भाषांमध्ये हॉटस्टार उपलब्ध आहे. टीव्ही मालिका, बातम्या, चित्रपट यासह हॉटस्टारवर 1 लाख तासांपर्यंतची व्हिडीओ कन्टेन्ट उपलब्ध आहे.