इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. आज आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात शारजामध्ये (Sharjah) खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांचे चाहते हा सामना ऑनलाईन डिस्ने + हॉटस्टारवर देखील पाहू शकतात. लिव्ह स्ट्रीमिंगसाठी, BCCI ने Disney + Hotstar सोबत करार केला आहे. आयपीएल सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाईन पाहण्यासाठी आणि सामने लाईव्ह पाहण्यासाठी चाहते आपल्या स्मार्टफोनवर डिस्ने+ हॉटस्टार अॅप डाउनलोड करून पाहू शकतात. अँड्रॉइड यूजर्स गुगल प्ले स्टोअरवरून हॉटस्टार डाउनलोड करू शकतात. डिस्ने + हॉटस्टार अॅपलच्या अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे.
अँड्रॉइड फोन यूजर्स त्यांच्या स्मार्टफोनमध्ये हॉटस्टार अॅप दोन प्रकारे डाउनलोड करू शकतात. पहिला पर्याय म्हणजे प्लेस्टोअरवरून अॅप डाउनलोड करणे, तर दुसरा पर्याय म्हणजे वेबस्टॉवरवरून हॉटस्टार APK डाऊनलोड करून इंस्टॉल करणे. तुमच्या मोबाईलमध्ये हॉटस्टार असे डाउनलोड करा:
1. मोबाइलमध्ये हॉटस्टार डाऊनलोड करणे खूप सोपे आहे. पहिले तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जा आणि तिथे हॉटस्टार शोधा.
2. त्यानंतर इंस्टॉल पर्यायावर जा आणि तुमच्या फोनमध्ये इंस्टॉल अॅपवर क्लिक करा.
3. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अॅप्लिकेशन मेनूमध्ये किंवा होम स्क्रीनवर हॉटस्टार अॅप आयकॉन दिसेल.
4. यानंतर तुम्ही तुमच्या Gmail किंवा फेसबुक खात्यात साइन इन करून किंवा आवश्यक तपशील देऊन साइन अप करून अॅप उघडू शकता.
5. तुम्ही साइन इन करताच, तुम्ही हॉटस्टारवर थेट व्हिडिओ, क्रीडा कार्यक्रम जसे IPL, टीव्ही शो, चित्रपट आणि बरेच काही पाहू शकता.
हॉटस्टार हिंदी, इंग्रजी, बंगाली, तमिळ, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. आयपीएल 2021 सामने लिव्ह स्ट्रीम करू शकतात आणि इतर क्रीडा कार्यक्रम, चित्रपट, टीव्ही शो देखील पाहू शकतात. आयपीएल 2021 मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग ऑनलाईन पाहण्यासाठी, तुम्हाला पॅकसह सदस्यता घ्यावी लागेल. यूजर्स हॉटस्टारच्या वेबसाइटवर आयपीएल 2021 सामने देखील पाहू शकतात.