IPL 2020 Update: एमएस धोनी आयपीएलमध्ये किती काळ खेळणार? वाचा काय म्हणाले चेन्नई सुपर किंग्जचे CEO
एमएस धोनी फोटो आणि एचडी वॉलपेपर (Photo Credit: Getty)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या 2021 आणि 2022 च्या आवृत्तीत महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings) नेतृत्व करेल असा विश्वास फ्रँचायसी सीईओ कासी विश्वनाथन (Kasi Vishwanathan) यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षीच्या  वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यापासून धोनी कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट न खेळलेला नाही. 39 वर्षीय धोनी आगामी आयपीएलमध्ये (IPL) 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत युएईमध्ये खेळणार आहे. विश्वनाथन यांनी Indiatoday द्वारे म्हटले की, "एमएस धोनी (आयपीएल 2020 आणि 21) आणि कदाचित पुढच्या वर्षी 2022 संघाचा भाग घ्यावा अशी आम्ही अपेक्षा करू शकतो. मी फक्त माध्यमांद्वारे अपडेट घेत आहे,  तो झारखंडमध्ये (Jharkhand) इनडोअर नेटमध्ये प्रशिक्षण घेत आहे असे समजले आहे. परंतु आम्हाला कर्णधाराबद्दल काळजी करण्याची गरज नाही बॉस, त्याच्याविषयी अजिबात चिंता करायची गरज नाही. त्याला आपल्या जबाबदाऱ्या ठाऊक आहेत आणि तो स्वत:ची व संघाची काळजी घेईल." (MS Dhoni Playing Bansuri: एमएस धोनीचा कृष्ण अवतार, CSK ने शेअर केला बासरी वाजविणारा जुना व्हिडिओ Watch Video)

जानेवारीत सीएसके फ्रँचायझीचे मालक इंडिया सिमेंट्सचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एन श्रीनिवासन यांनी सांगितले होते की धोनीला 2021 आयपीएलच्या मेगा लिलावासाठी रिटेन केले जाईल. 2019 विश्वचषक स्पर्धेपासून धोनी बीसीसीआयकडून केंद्रीय कंत्राट मिळविण्यात अपयशी ठरल्यामुळे त्याच्या भविष्याविषयी अनेकदा चर्चा सुरू आहेत. धोनीने यासर्वांवर मौन ठेवले असले तरी मार्च महिन्यात विकेटकीपर-फलंदाजाने चेपक येथे पुन्हा प्रशिक्षण सुरु करत त्याच्यात क्रिकेट अजून बाकी असल्याचाइशारा दिला होता.

त्याआधी धोनी आपल्या मूळ गावी रांचीमध्ये झारखंड राज्य क्रिकेट संघटनेच्या (जेएससीए) इनडोअर सुविधेत सराव करताना दिसला होता. दरम्यान, सीएसके 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान एक लहान प्रशिक्षण शिबिर योजना आखत आहे. 21ऑगस्ट रोजी सीएसके युएईला रवाना होण्याची अपेक्षा करीत असताना 14 ऑगस्ट रोजी सर्व खेळाडू चेन्नईत जमतील याबाबही विश्वनाथन यांनी पुष्टी केली. ते म्हणाले की, “हे एक कौशल्य आधारित प्लस प्रशिक्षण शिबिर असेल. ते त्वरित कौशल्यांनी प्रारंभ करू शकत नाही कारण ते मोठ्या वेळानंतर परत येत आहेत.”