Hobart Hurricanes vs Sydney Sixers Qualifier Big Bash League 2024-25 Dream11 Team Prediction: बिग बॅश लीग 2024-25 चा क्वालिफायर सामना आज 21 जानेवारी रोजी होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल येथे खेळला जाईल. या स्पर्धेत होबार्ट हरिकेन्सने शानदार कामगिरी केली. होबार्ट हरिकेन्सने 10 पैकी 7 सामने जिंकले आहेत तर 2 गमावले आहेत आणि एक सामना अनिर्णीत राहिला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये, होबार्ट हरिकेन्स संघ 15 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे, सिडनी सिक्सर्सने स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. सिडनी सिक्सर्सने 10 पैकी 6 सामने जिंकले, 2 हरले आणि 2 सामने अनिर्णीत राहिले आहेत. सिडनी सिक्सर्स संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
दोन्ही संघांमधील समोरासमोरचा विक्रम
बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी सिक्सर्स संघ 20 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये होबार्ट हरिकेन्सचा वरचष्मा दिसतो. होबार्ट हरिकेन्सने 20 पैकी 10 सामने जिंकले आहेत. तर सिडनी सिक्सर्सने 9 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णीत राहिला.
पिच रिपोर्ट
बेलेरिव्ह ओव्हलची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली राहिली आहे. मात्र, ढगाळ हवामानामुळे, या सामन्यात वेगवान गोलंदाजांना थोडी अधिक मदत मिळू शकते. त्यामुळे फलंदाजांना थोडी अधिक तागद लावावी लागू शकते. सामन्यावर पावसाचादेखील परिणाम होऊ शकतो.
होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी सिक्सर्स ड्रीम11 भाकित: फलंदाजाची निवड
टिम डेव्हिड हा होबार्ट हरिकेन्सचा एक स्फोटक फलंदाज आहे. याशिवाय, कॅलेब ज्वेल आणि चार्ली वॅकिम यांना तुमच्या संघात ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही खेळाडू उत्तम फॉर्ममध्ये आहेत त्यामुळे ते ड्रीम11 संघासाठी एक चांगला पर्याय ठरतील. दुसरीकडे, सिडनी सिक्सर्सकडून कर्टिस पॅटरसन, जॉर्डन सिल्क, लाचलन शॉ आहेत. तुम्ही तुमच्या संघात तिघांपैकी कोणताही एक किंवा दोन्ही ठेवू शकता.
संघात विकेटकीपर म्हणून कोणाचा समावेश करावा?
होबार्ट हरिकेन्सचे बेन मॅकडर्मॉट आणि मॅथ्यू वेड हे यष्टीरक्षक आहेत. याशिवाय, तुम्ही तुमच्या ड्रीम 11 संघात सिडनी सिक्सर्सच्या जोश फिलिपचा समावेश करू शकता.
होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी सिक्सर्स ड्रीम11 अंदाज: अष्टपैलू आणि गोलंदाजांच्या निवडी
दोन्ही संघ अष्टपैलू खेळाडूंनी भरलेले आहेत. होबार्ट हरिकेन्सकडून मिचेल ओवेन हा एक चांगला पर्याय असेल. जो बॅट आणि बॉल दोन्हीने चमत्कार करू शकतो आणि एक अनुभवी खेळाडू देखील आहे. याशिवाय, निखिल चौधरी आणि ख्रिस जॉर्डन हे देखील होबार्ट हरिकेन्सकडून चांगले पर्याय असतील. सिडनी सिक्सर्सकडून मोइसेस हेन्रिक्स, जॅक एडवर्ड्स आणि हेडन केर हे चांगले पर्याय असतील. याशिवाय, गोलंदाजीत नॅथन एलिस (कर्णधार), पीटर हॅटझोग्लू, मार्कस बीन, बेन द्वारशीस, शॉन अॅबॉट, जाफर चौहान, टॉड मर्फी हे गोलंदाजांसोबत जाऊ शकतात.
सर्वोत्तम संभाव्य ड्रीम11 संघ
यष्टीरक्षक: जोश फिलिप. याशिवाय, बेन मॅकडर्मॉट आणि मॅथ्यू वेड यांचा पर्याय देखील आहे.
फलंदाज: कुर्टिस पॅटरसन, टिम डेव्हिड
अष्टपैलू खेळाडू: मोइसेस हेन्रिक्स, जॅक एडवर्ड्स, निखिल चौधरी, मिशेल ओवेन
गोलंदाज: नॅथन एलिस, मार्कस बीन, शॉन अॅबॉट, बेन द्वारशीस
कर्णधार आणि उपकर्णधार: मिचेल ओवेन (कर्णधार), जॅक एडवर्ड्स (उपकर्णधार).
होबार्ट हरिकेन्स: मिचेल ओवेन, कॅलेब ज्वेल, चार्ली वाकिम, निखिल चौधरी, बेन मॅकडर्मॉट, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, नॅथन एलिस (कर्णधार), पीटर हॅटझोग्लू, ख्रिस जॉर्डन, मार्कस बीन
सिडनी सिक्सर्स: जोश फिलिप (यष्टीरक्षक), कुर्टिस पॅटरसन, जॅक एडवर्ड्स, मोइसेस हेन्रिक्स (कर्णधार), जॉर्डन सिल्क, लाचलान शॉ, बेन द्वारशीस, हेडन केर, शॉन अॅबॉट, जाफर चोहान, टॉड मर्फी