Hobart Hurricanes vs Sydney Sixers Qualifier Big Bash League 2024-25 Live Streaming: बिग बॅश लीग 2024-25 चा क्वालिफायर सामना आज 21 जानेवारी रोजी होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी सिक्सर्स (Hobart Hurricanes vs Sydney Sixers) यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल येथे खेळला जाईल. या स्पर्धेत होबार्ट हरिकेन्सने शानदार कामगिरी केली. होबार्ट हरिकेन्सने 10 पैकी 7 सामने जिंकले आहेत, 2 गमावले आहेत आणि एक सामना अनिर्णीत राहिला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये, होबार्ट हरिकेन्स संघ 15 गुणांसह पहिल्या स्थानावर राहिला. दुसरीकडे, सिडनी सिक्सर्सने स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. सिडनी सिक्सर्सने 10 पैकी 6 सामने जिंकले, 2 हरले आणि 2 सामने अनिर्णीत राहिले. सिडनी सिक्सर्स संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर राहिला. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळतो. विजेत्या संघाला अंतिम फेरीचे थेट तिकीट मिळेल. तर पराभूत संघाला एक संधी मिळेल.
बिग बॅश लीग 2024-25 मध्ये होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील क्वालिफायर सामना कधी खेळला जाईल?
बिग बॅश लीग 2024-25 मध्ये होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील क्वालिफायर सामना बुधवारी 21 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 2 वाजता सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी येथे खेळला जाईल.
बिग बॅश लीग 2024-25 मध्ये होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील 30 वा सामना कुठे पाहायचा?
होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील बिग बॅश लीग 2024-25 च्या पात्रता सामन्याचे भारतातील स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर थेट प्रक्षेपण केले जाईल. याशिवाय, तुम्ही डिस्ने+ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
दोन्ही संघांचे पथके
होबार्ट हरिकेन्स संघ: मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), नॅथन एलिस (कर्णधार), कॅलेब ज्वेल, मिशेल ओवेन, चार्ली वॅकिम, बेन मॅकडर्मॉट, निखिल चौधरी, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, कॅमेरॉन गॅनन, रिले मेरेडिथ, पॅट्रिक डूली, जेक डोरन, पीटर हातझोग्लू
सिडनी सिक्सर्स संघ: जोश फिलिप (यष्टीरक्षक), मोइसेस हेन्रिक्स (कर्णधार), कुर्टिस पॅटरसन, जॅक एडवर्ड्स, जॉर्डन सिल्क, लकलन शॉ, हेडन केर, बेन द्वारशीस, जाफर चौहान, जोएल डेव्हिस, बेन मॅनेंटी, मिचेल पेरी, लकलन हर्न.