भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मिताली राजची (Mithali Raj) गणना जगातील अव्वल महिला क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. तिने तिच्या कारकीर्दीत अनेक मोठे टप्पे गाठले आहेत. तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाला उंचावर नेण्यात तिची मोलाची भूमिका आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मिताली राजने आज तिच्या कारकीर्दीत आणखी एक मोठे पराक्रम केले आहे. त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय करिअरची 22 वर्षे पूर्ण केली आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यांच्यानंतर असा कारनामा करणारी ती दुसरी खेळाडू ठरली आहे.
मिताली राजने 26 जून 1999 रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता, त्यामुळे आज तिने 22 वर्षे पूर्ण केली आहेत. या यादीत केवळ भारताचे महान फलंदाज सचिन तेंडुलकर होते. तेंडुलकर यांची कारकीर्द 22 वर्षे 91 दिवस झाली आहे. त्यांनी 18 डिसेंबर 1989 रोजी पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले आणि त्यांचा शेवटचा सामना देखील पाकिस्तानविरुद्ध18 मार्च 2012 रोजी खेळला गेला होता. हे देखील वाचा- Team India WTC 2021-23 Schedule: पुढील कसोटी चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाचे वेळापत्रक आऊट, ‘या’ 6 संघांशी भिडणार
ट्विट-
Mithali Raj completes 22 years in international cricket today. 🤩 pic.twitter.com/jxPFLDpHAw
— Wisden India (@WisdenIndia) June 26, 2021
मिताली राजने आपली कारकिर्दीची सुरुवात 1999 पासून केली आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम 6 हजार धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रम मितालीच्या नावावर आहे. त्यानंतर 2016 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तसेच मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारी मिताली पहिली भारतीय आणि जगातील दुसरी क्रिकेटर ठरली आहे. इंग्लंड महिला क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चार्लोट एडवर्डने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा केल्या आहेत.