India vs Australia: ऑस्ट्रेलिया विरुद्ध रंगणाऱ्या T20 आणि वनडे मालिकेतून हार्दिक पंड्या बाहेर; 'या' खेळाडूला मिळणार संधी
Hardik Pandya (Photo Credits: Indian Cricket Team/Facebook)

India vs Australia T20 & ODIs Series: ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या T20 आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून भारताचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला माघार घ्यावी लागली आहे. पाठदुखीच्या त्रासामुळे अनफिट ठरलेला पंड्या या मालिकांमध्ये खेळू शकणार नाही. हार्दिक ऐवजी रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) संघात स्थान देण्यात येणार आहे. मात्र रवींद्र जडेजा केवळ वन डे मालिकांसाठी खेळेल. India vs Australia T20 Series 2019: ऑस्टेलिया विरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया T20 मालिकेला 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेतील दुसरा सामना 27 फेब्रुवारीला रंगेल. तर एकदिवसीय मालिकेतील सामने 2 ते 13 मार्च दरम्यान खेळले जातील.