युवराज सिंह याच्याप्रमाणे Team India साठी ‘हे’ 5 खेळाडू बनू शकतात नवीन फिनिशर, बलाढ्य संघापुढे दाखवला आहे दम
हार्दिक पांड्या आणि शिखर धवन (Photo Credit: Twitter/BCCI)

क्रिकेटमध्ये विरोधी संघावर वर्चस्व गाजवण्यासाठी सुरुवातीसह शेवटही उत्तम होणे गरजेचे असते. इतिहासात डोकावून बघितले असता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम संघांकडे उत्कृष्ट फिनिशर होते. टीम इंडियाला (Team India) खेळाच्या सर्व प्रकारांमध्ये वर्चस्व राखणारा एक संघ मानला जातो. भारतीय संघाकडून मागील अनेक वर्ष युवराज सिंह (Yuvraj Singh), महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) यांनी फिनिशरची भूमिका पार पाडली होती. मात्र आता दोघेही क्रिकेटमधून निवृत्त झाले आहे. 2007 चा टी-20 वर्ल्ड कप असो किंवा 2011 वनडे वर्ल्ड कप युवराज सिंहने संघाच्या विजयात प्रत्येक वेळी फिनिशर म्हणून मोलाचे योगदान दिले आहे. युवराजच्या खेळातून निवृत्तीनंतर एमएस धोनीने आपल्या चपळाईने सिक्सर किंगची जागा भरून काढली होती मात्र मागील वर्षी धोनीच्या निवृत्तीनंतर भारतीय संघ फिनिशरच्या शोधात आहे. अशा स्थितीत संघात असे काही खेळाडू आहे जे फिनिशरची भूमिका पार पडू शकतात. (Players Who Can Replace R Ashwin In India Test Team: टीम इंडियाच्या टेस्ट संघात रविचंद्रन अश्विनची जागा घेण्यासाठी 'हे' 3 फिरकीपटू आहेत मोठे दावेदार)

1. रवींद्र जडेजा

अलीकडच्या काळात जडेजाने आपल्या फलंदाजी शैलीत मोठा बदल केला आहे. वर्ल्ड कप असो किंवा नुकताच संपुष्टात आलेला टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा, जडेजाने असंख्य प्रसंगी संघर्षशील भारतीय संघासाठी मॅच-विनिंग खेळी केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-20 मालिकेमध्ये जडेजाने सलामीच्या खेळात पुन्हा आपली योग्यता सिद्ध केली. आयपीएल 2020मधेही सीएसके संघर्ष करत असली तरी जडेजाने आपल्या फॉर्मने प्रभावी कामगिरी केली.

2. हार्दिक पांड्या

पांड्याने आपल्या बॅटिंगने मागील काही वर्षात एक्सपर्टसची वाहवाही मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित ओव्हरमध्ये हार्दिकने फिनिसर म्हणून उत्तम भूमिका बजावली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेत त्याने 3 सामन्यात 105 च्या सरासरीने 210 धावा केल्या आणि गोलंदाजीने 1 विकेटही मिळवली. शिवाय, टी-20 सामन्यात एकूण 78 धावा काढल्या.

3. वॉशिंग्टन सुंदर

युवा वॉशिंग्टनने आपल्या अचूक गोलंदाजीने भारतासाठी उत्तम कामगिरी केली आहे. पॉवर प्लेमध्ये फलंदाजांना बांधून ठेवण्याचे काम तो सुदंर करतो. तसेच अनेक वेळा त्याने शेवटच्या षटकांत उत्तम फलंदाजी देखील केलेली आहे. ऑस्ट्रेलियाताविरुद्ध सुंदरने 62 धावा केल्या आणि आपला दम दाखवला. सुंदरकडे क्षमता असून तो महत्त्वाच्या सामन्यात संघासाठी मोलाची भूमिका बजावू शकतो.

4. रिषभ पंत

टीम इंडियामधील युवा खेळाडूंपैकी रिषभ पंतवर सध्या सर्वांच्या नजरा आहेत. परदेशात पंतने मागील काही वर्षात उठावदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी आणि ब्रिस्बेन येथील त्याचा खेळ कदाचितच एखादा चाहता विसरू शकेल. कांगारू संघाच्या गोलंदाजांची धुलाई करत पंतने ब्रिस्बेनमध्ये एकहाती संघाला सामना जिंकवून दिला होता. पंत मोठे फक्त खेळण्यात सक्षम आहे जे एका खेळाडूला यशस्वी फिनिशर बनवते.

5. श्रेयस अय्यर

मुंबईच्या फलंदाज श्रेयस अय्यरला आता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताला पसंती जात असल्याने निवडकर्ता कदाचित फिनिशरच्या भूमिकेसाठी त्याच्याकडे अपेक्षा ठेवू शकतात. न्यूझीलंडविरुद्ध मागील वर्षी वनडे मालिकेत त्याने आपल्या भूमिकेने स्थान निश्चित केल्याचे दिसून आले आहे. यावेळी अय्यरने सलग तीन अर्धशतके ठोकली. त्याची बॅटिंग क्लास आणि तंत्र त्याला एक उत्तम फिनिशर बनवू शकते. श्रेयसने यापूर्वी 24 टी-20 आणि 21 ओनिडायस सामन्यात आपला दम दाखवला असून त्याचे आकडे त्याच्या सुसंगततेचे आणि प्रतिभाचे प्रमाणपत्र आहे.