हार्दिक पंड्या याने एक वर्षानंतर 'कॉफी विथ करण' विवादावर सोडले मौन, पाहा काय म्हणाला
हार्दिक पंड्या, करण जोहर आणि केएल राहुल (Photo Credits: Twitter)

मागील वर्षी भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) शोमध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या होत्या, ज्यामुळे 2019 वर्षाची सुरूवात हार्दिकसाठी वादग्रस्त ठरली होती. बॉलीवूड चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) याच्या टीव्ही शो कॉफी विथ करण या कार्यक्रमात हार्दिक महिलांविषयी केलेल्या टिप्पण्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. हार्दिकबरोबर टीम इंडियाचा सलामी फलंदाज केएल राहुल (KL Rahul) देखील या शोमध्ये होता. या विवादित शोच्या एक वर्षानंतर हार्दिकने संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आणि म्हटले कि बॉल माझ्या कोर्टात नव्हता, परंतु दुसर्‍या कोणाच्या कोर्टात होता. या विवादामुळे हार्दिक आणि राहुलने फक्त टीम इंडियातून बाहेरच नाही करण्यात आले तर सार्वजनिकपाने त्रास सहन करावा लागला होता. गेल्या वर्षी त्या घटनेची आठवण काढत हार्दिकने मोठ्या दिवसांनंतर आपले मौन सोडले. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार हार्दिकने आता या प्रकरणात स्पष्टीकरण दिले आहे. (भारतीय संघाचा ऑलराउंडर स्टार हार्दिक पांड्या मॉडेल, अभिनेत्री नताशा स्टेनकोविच हिला अनोख्या पद्धतीने प्रपोज करत केली Engagement)

"आम्हाला क्रिकेटपटू म्हणून काय होणार आहे हे माहित नव्हते. बॉल माझ्या कोर्टात नव्हता, परंतु कोणा दुसर्‍याच्या कोर्टात होता, जिथे इतर कोणास निर्णय घ्यायचा होता. ही अशी परिस्थिती होती ज्यात आपण स्वतःला पाहू इच्छित नाही." गेल्या वर्षी ‘कॉफी विथ करण’ शो मध्ये सेक्सिस्ट कमेंट्समुळे पंड्या आणि राहुलला प्रेक्षकांचा प्रचंड राग सहन करावा लागला होता.

चाहत्यांची आणि टीम इंडियातील सहकाऱ्यांची दिलगिरी व्यक्त करूनही त्यांना बीसीसीआयने निलंबित केले आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर केले. शिवाय, बीसीसीआयने नंतर या दोघांना प्रत्येकी 20 लाख रुपये दंड ठोठावला. पंड्या आणि राहुलना अंधांच्या क्रिकेटच्या बढतीसाठी तयार केलेल्या निधीत प्रत्येकी दहा लाख रुपये जमा करण्यास सांगितले. या चॅट शोचे होस्ट असलेले चित्रपट निर्माते करणनेही असे म्हटले होते की, क्रिकेटपटूंना सहन कराव्या लागणाऱ्या या प्रतिक्रियांना तो स्वतः “जबाबदार” असल्याचे मानत आहे. दरम्यान, हार्दिकने नुकतच गर्लफ्रेंड नतासा स्टॅनकोविचसह गुपचूप साखरपुडा केले. आणि सध्या तो पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे.