Happy Birthday VVS Laxman: टीम इंडियासाठी 100 टेस्ट सामने खेळला पण, वर्ल्ड कप संघात मात्र मिळाले नाही स्थान, आंतराष्ट्रीय सामन्यात ठोकले फक्त 9 षटकार; जाणून घ्या व्ही व्ही एस लक्ष्मण बद्दलचे हटके किस्से

आज टीम इंडियाचा माजी स्टायलिश कसोटी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) चा वाढदिवस आहे. लक्ष्मण 45 वर्षांचा झाला. लक्ष्मणला 'व्हेरी व्हेरी स्पेशल' (Very Very Special) देखील म्हटले जाते आणि याचे कारण म्हणजे त्याची जबरदस्त फलंदाजी. 2003-2004 ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे मालिकेत सलग शानदार डाव खेळल्यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू इयान चॅपेल (Ian Chappell) यांनी टोपणनाव बहाल केले. 1996 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या लक्ष्मणने अनेक मॅच विंनिंग डाव खेळले आहेत. यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये खेळलेला 281 धावांचा डाव सर्वांच्या आजही लक्षात राहण्यासारखा आहे. हा लक्ष्मणच्या करिअरमधील क्लासिक डाव होता. शिवाय, लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या अनके संस्मरणीय डावांसाठी आजही लक्षात ठेवले जाते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 29 कसोटी सामन्यात लक्ष्मणने 49.67 च्या सरासरीने 2,434 धावा केल्या. यात 6 शतका आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.

लक्ष्मणने कसोटी सामन्यात आपल्या सर्वोत्कृष्ट खेळीने अनेक वेळा भारताला विजय मिळवून दिला आहे. क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2012 अ‍ॅडिलेडमध्ये अंतिम टेस्ट सामना खेळला होता, तर 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध अंतिम वनडे सामना खेळाला. दरम्यान, आपण जाणून घेऊया 5 हटके किस्से: 

1. लक्ष्मणने भारतीय संघासाठी अनेक स्मरणीय सामने खेळले आहेत. विशेषत: ऑस्ट्रेलियाविरुद्ध महान खेळामुळे लक्ष्मण चांगलाच परिचित आणि ओळखला जातो. मार्च 2001 मध्ये त्याने कोलकाताच्या ईडन गार्डनवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 281 धावांची शानदार खेळी केली होती. लक्ष्मणने त्याच्या टेस्ट करिअरमध्ये 100 पेक्षा अधिक सामने खेळले आहेत. 1996 पासून भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मणने एकही विश्वचषक सामना खेळला नाही. लक्ष्मण 86 वनडे सामने खेळला आहे, पण विश्वचषकमध्ये त्याला भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही. 2003 दरम्यान त्याचे नाव समोर आले होते, पण अंतिम क्षणी दिनेश मोंगिया याला संघात स्थान देण्यात आले.

2. 1 नोव्हेंबर 1974 रोजी हैदराबादमध्ये जन्मलेले लक्ष्मण हे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन (Sarvepalli Radhakrishnan) यांचे थोरले पुतणे आहेत. दिवंगत डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते.

3. भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक करणारा लक्ष्मण हा पहिला फलंदाज होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ईडन गार्डन्समध्ये खेळलेली त्याची 281 धावांचा डाव हा भारतासाठी केलेल्या सर्वाधिक वैयक्तिक धावा होत्या. पण, वीरेंद्र सेहवाग याने लक्ष्मणच्या या कामगिरीला मागे टाकत पहिले 2004 मध्ये पाकिस्तानविरुद्ध मुलतानमध्ये 309 आणि नंतर 2008 मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ३१९ धावा करत भारतासाठी वैयक्तिक धावांचा विक्रम नोंदवला.

4. ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्मणने त्याच्या कारकिर्दीत शानदार प्रदर्शन केले आहेत. 2010 च्या मोहालीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्टदरम्यान लक्ष्मणने संघाला एक हाती विजय मिळवून दिला होता. व्हीव्हीएसदेखील 2010 मधील खेळलेलंही खेळी त्याची सर्वात महत्वाची खेळी मानतो.

5. लक्ष्मणने टीम इंडियासाठी 1996-2006 दरम्यान 354‬ सामने खेळला आहे. त्याने अनेक लक्षात राहतील असे सामनेही खेळले आहेत. पण, यात सर्वात आश्चर्याची बाद म्हणजे वनडे आणि टेस्ट मिळून लक्ष्मणने फक्त 9 आंतरराष्ट्रीय षटकार लागले आहेत. होय, लक्ष्मणने वनडेमध्ये 4 आणि टेस्टमध्ये 5 षटकार ठोकले आहेत.

भारतासाठी सर्वाधिक प्रदर्शन करणाऱ्या लक्ष्मणने 134 टेस्टमध्ये 17 शतक आणि 56 अर्धशतकाच्या मदतीने 8,781 धावा केल्या आहेत. तर,86 वनडेमध्ये 6 शतक आणि 19 अर्धशतक केले आहेत. पण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने खेळलेल्या मॅचसाठी त्याची आज आणि भविष्यातही आठवण केली जाईल.