Happy Birthday Virat Kohli: टीम इंडियाचा कर्णधार आणि 'रन मशीन' म्हणून ओळखल्या जाणारा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) आज वाढदिवस आहे. 5 नोव्हेंबर रोजी विराट आपला 32वा वाढदिवस साजरा करत आहे. यंदा विराट आपला वाढदिवस युएई येथे पत्नी अनुष्का शर्मा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (Royal Challengers Bangalore) सह खेळाडूंसोबत साजरा कारणार आहे. भारतीय संघाला (Indian Cricket Team) घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये सलग 11 मालिका जिंकावणाऱ्या कोहलीच्या नेतृत्वात भारताने 2008 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला आणि नंतर त्यांचे त्याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका दशकात 20,000 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू आहे. या दरम्यान कोहलीने कारकिर्दीत 5 सर्वोत्कृष्ट डाव खेळले आहेत जे आपण कधीही विसरू शकत नाही.
धावांचा पाठलाग करणारा कर्णधार कोहलीची कारकीर्द मोठ्या प्रमाणात वैयक्तिक स्कोअरद्वारे परिभाषित केली जाते. 2008 मध्ये पदार्पणानंतर कोहलीने आपल्या आजवरच्या क्रिकेट इतिहासात अनेक महान खेळाडूंपेक्षा पछाडले आहे. आज भारताची 'रन-मशीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराटच्या 32व्या वाढदिवशी आपण पाहणार आहोत त्याचे 5 सर्वोत्कृष्ट डाव ज्याने त्याला 'किंग कोहली' बनवले.
पाकिस्तानविरुद्ध 183 धावा
विराटने पाकिस्तानविरुद्ध कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 183 धावा केल्या होत्या. हा तोच सामना होता जिथे सचिन तेंडुलकरने अंतिमवेल निळी जर्सी परिधान केली होती. पाकिस्तानने भारतासमोर 330 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. सलामी फलंदाज गौतम गंभीर बाद झाल्यावर विराटने 183 धावा करून न फक्त भारताला दबावाच्या परिस्थितीतून बाहेर काढले तर संघाला एकतर्फी सामना देखील जिंकवून दिला. विशेष म्हणजे, माजी कर्णधार सौरव गांगुली आणि महेंद्र सिंह धोनी यांची सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या 183 आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 52 चेंडूत शतक
2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध जयपूरमध्ये झालेल्या दुसर्या सामन्यात विराटने 52 चेंडूत शानदार शतक ठोकले होते. या शतकी खेळीमुळे कोहलीही भारतासाठी सर्वात वेगवान शतक ठोकणारा खेळाडू बनला. या दरम्यान कोहलीने 60 चेंडूत सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला.
2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 157
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार कोहलीने नाबाद 157 धावांचा आणखीन एक संस्मरणीय डाव खेळला. या डावात कोहलीने वनडे करिअरमध्ये 10,000 धावांचा टप्पा गाठल्याने हा डाव अधिक संस्मरणीय ठरला.
सीबी मालिका 2012, श्रीलंकाविरुद्ध नाबाद 133
होबार्टमधील सीबी मालिकेत कोहलीचा श्रीलंकेविरूद्ध नाबाद 133 धावांचा डाव त्याने खेळलेला आतापर्यंतची सर्वोत्तम डाव होता. त्या सामन्यात लसिथ मलिंगाविरुध्द कोहलीने जशी कामगिरी केली त्याप्रमाणे कोणत्याही फलंदाजाला करताना पहिले नाही. त्रिकोणीय स्पर्धेत आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला 40 ओव्हरमध्ये 321 धावांची गरज होती. कोहली बाहेर आला आणि त्याने श्रीलंकेच्या गोलंदाजीची धुलाई सुरु केली व भारताने अवघ्या 36.4 ओव्हरमध्ये लक्ष्य गाठले.
2018 इंग्लंड कसोटी मालिकेत 149
2014 मध्ये इंग्लंडच्या अखेरच्या दौर्यावर 13.50च्या सरासरीने धावा केल्याने या दौऱ्यावर कोहली ठसा उमटवण्यासाठी उत्साहात होता. बर्मिंघम येथे मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने झुंझार शतक झळकावले आणि जिमी अँडरसनविरुद्ध संघर्षानंतर 149 धावांची खेळी केली. कोहली वगळता इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाला 26 धावांची खेळी करता आली नाही. त्यानंतर नॉटिंघॅम येथील दोन डावात त्याने कोहलीने 97 आणि 103 धावांचा डाव खेळला.
कोहलीची तीनही स्वरूपात सरासरी 50च्या वर सरासरी आहे, जे आजकालच्या क्रिकेटमध्ये अन्य कोणत्याही क्रिकेटपटूला शक्य झाले नाही. कोहलीने 248 एकदिवसीय सामन्यात 43 शतकांसह 11867 धावा केल्या आहेत तर 86 कसोटींमध्ये त्याने 53.62 च्या सरासरीने 7240 धावा केल्या आहेत. 82 टी -20 मध्ये त्याने अर्धशतकांसह 50.80 च्या सरासरीने सर्वाधिक 2794 धावा केल्या आहेत. दरम्यान, कोहलीच्या वाढदिवशी तो पुढेही भारतासाठी असेच अविस्मरणीय डाव खेळत राहवो अशी आमची आणि सर्व क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे.