Happy Birthday Sunil Gavaskar: भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) 10 जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा करीत आहेत. क्रिकेट विश्वात फक्त काही खेळाडूंच्या नावासमोर 'महान' हा शब्द जोडला गेला आणि गावस्कर यांचा या महान खेळाडूंमध्ये समावेश केला जातो. 'लिटिल मास्टर'च्या (Little Master) नावाने प्रसिद्ध गावस्कर यांचा जन्म 1949 मध्ये मुंबईमध्ये झाला. टीम इंडियाचा (Indian Team) सर्वात यशस्वी सलामी फलंदाज म्हणून काम करणारा गावस्कर यांना त्याच्या कलात्मक खेळासाठी लिटल मास्टर म्हणूनही ओळखला जाते. गावस्कर हा भारतातील पहिला असा खेळाडू होता, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा 10,000 धावा पूर्ण करण्याचा विक्रमी टप्पा गाठला होता. शिवाय, गावस्कर एक असे फलंदाज होते जे मैदानात हेल्मेट न ठेवता फलंदाजी करायचे. गावस्करांची हेल्मेटशिवाय खेळण्याची कहाणी प्रसिद्ध आहे कारण त्यावेळी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडीयन संघात बरेच घातक वेगवान गोलंदाज असायचे. ज्यांचा सामना गावस्कर हेल्मेट न घालता करायचे.
गावस्कर यांनी आपल्या खेळातून भारतीय क्रिकेटसाठी अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले आहेत, जे कधीच विसरता येणार नाही. गावस्कर एक परिपूर्ण फलंदाज होते. आज त्यांच्या वाढदिवशी आपण जणू घेऊया लिटिल मास्टरचे अनोखे क्रिकेट रेकॉर्ड:
1. गावस्कर यांना नेहमीच 10,000 कसोटी धावा करणारा पहिला क्रिकेटपटू म्हणून संबोधले जाते. 1987 पाकिस्तानविरुद्ध त्यांच्या अखेरच्या कसोटी मालिकेमध्ये गावस्कर यांनी अहमदाबाद कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 63 धावा केल्या आणि दहा हजारांचा टप्पा गाठणारे पहिले फलंदाज ठरले.
2. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 34 शतके ठोकण्याचा विक्रम गावसकर यांच्या नावावर होता, जो नंतर सचिनने मोडला. गावस्कर यांनी 125 कसोटी सामन्यांमध्ये 34 शतकं झळकावली होती.
3. गावस्कर भारताचे सर्वात यशस्वी क्रिकेटपटू आहे. वेस्ट इंडिज संघाविरुद्ध पदार्पणातील कसोटी मालिकेत सर्वाधिक 774 धावा केल्या.
4. आतापर्यंत ते 2 स्थळ- पोर्ट ऑफ स्पेन आणि वानखेडे स्टेडियमवर सलग चार शतके ठोकणारा एकमेव क्रिकेटपटू आहे.
5. आपल्या पदार्पणाच्या सामान्यापासून गावस्कर यांना वेस्ट इंडीज खेळायला आवडायचे. विंडीज हे 70 आणि 80 च्या दशकात अजिंक्य ठरले पण गावस्कर यांनी त्यांच्या विरुद्ध खेळलेल्या 27 सामन्यात 13 शतकं ठोकली.
अशा काळात जेव्हा जगभरातील खेळपट्ट्या फलंदाजांसाठी अनुकूल नसायच्या तेव्हा गावस्कर यांनी आपले उत्कृष्ट कौशल्याचा आणि निर्भय वृत्तीने गोलंदाजांवर राज्य केले. उजव्या हाताच्या फलंदाजाने खेळाच्या प्रदीर्घ स्वरूपात फलंदाजीचे अनेक विक्रम नोंदवले आहेत. गावस्कर यांनी नोव्हेंबर 1987 मध्ये खेळाला निरोप देण्यापूर्वी 16 वर्षे भारतीय क्रिकेटची सेवा केली होती. आज त्यांच्या 71 व्या वाढदिवशी आम्हा Latestly कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.