Happy Birthday Hardik Pandya: 'कॉफी विथ करण' एपिसोडपेक्षाही मनोरंजक आहेक हार्दिक पंड्या याच्याबद्दलचे हे 5 किस्से, जाणून घ्या

टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आज त्याचा 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या दमदार खेळाच्या जोरावर हार्दिकने टीम इंडिया (Indian Team) मध्ये अष्टपैलू म्हणून स्थान निर्माण केले आहेत. सध्या तो दुखापतीमुळे संघातून बाहेर असला तरीही चाहते मात्र त्याची आठवण काढत असतात. जरी आपण क्रिकेटची उपासना करणाऱ्या भारतीयांपैकी नसला तरीही हार्दिक पंड्या, या नावाच्या एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला शक्यतो माहिती असेलच. मैदानात आणि मैदानाबाहेरच्या मनोवृत्तीने तो त्वरित भारतीय क्रिकेटपटूंसाठी नव्या पिढीचा पोस्टर बॉय बनला. अनेक उल्लेखनीय कामगिरीनंतर त्याचे भविष्य उज्वळ आहे हे म्हणणे चुकीचे नसेल. पण, काही काळाने हार्दिकच्या आयुष्यात काही गोष्टींनी वेगळे वळण घेतले. आणि हार्दिकला वादांना सामोरे जावे लागले. (बेबी स्टेप, व्हील चेअर... लंडनमध्ये Lower Back वर शस्त्रक्रियेनंतर हार्दिक पंड्या Recovery च्या मार्गावर, पहा Video)

चित्रपट निर्माता करण जोहर याचा चॅट शो 'कॉफी विथ करण 6' (Koffee With Karan) अनेक दिवस चर्चेत राहिला. हार्दिक त्याचा मित्र आणि सहकारी के एल राहुल याच्यासोबत या शोमध्ये आला होता. हार्दिकने या शोमध्ये अशी काही विधानं केली होती ज्यामुळे त्याला संघातून काही काळासाठी निलंबित केले गेले होते. आज हार्दिक पंड्या याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया देशातील सर्वात वादग्रस्त क्रिकेटपटूविषयी काही किस्से:

1 आर्थिक परिस्थिती

हे सर्वानाच माहित असेल की, हार्दिकच्या घरची परिस्थिती काही चांगली नव्हती. अनेक आर्थिक समस्यांना तोंड देऊन त्यांनी टीम इंडियामध्ये स्थान मिळवले आहेत. हार्दिक अंत्यंत साधारण कुटुंबातुन आला आहे. नुकतच हार्दिकने खुलासा की तो आणि त्याचा भाऊ क्रुणाल मॅच खेळण्यासाठी लांबून प्रवास करत असत. 2010 मध्ये वडिलांना हृदयविकाराचा झटका लागल्याने त्याचे वडील जास्त काम करू शकत नव्हते ज्यामुळे घरची परिस्थिती बिकट झाली. हार्दिकने नववी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर क्रिकेटवर पूर्णपणे लक्ष्य केंद्रित केले.

2 कोच किरण मोरे यांच्या अकादमीत घडवून आणला मोठा बदल

लहापणीच हार्दिक त्याच्या कुटुंबासह क्रिकेट कारकीर्दीची सोय करण्यासाठी वडोदराला स्थलांतरित झाला. पांड्य बंधूंच्या वडिलांनी त्यांना एक दिवशी किरण मोरे (Kiran More) यांच्या अकादमीमध्ये नेले. पहिले त्यांनी दोन्ही भावांना घेण्यासाठी नकार दिला कारण नोंदणीसाठी किमान वय 12 वर्षे होते. पण, त्यांच्या वडिलांनी धैर्य गमावला नाही आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मोरे यांना त्याचे कौशल्य पारखून घेण्यासाठी तयार केले. मोरेंनी दोन्ही बंधूंच्या कौशल्याची परीक्षा घेतली तेव्हा तो त्यांच्यातील कौशल्य आणि कठोर परिश्रम करण्याच्या इच्छेने प्रभावित झाला. त्या दिवशी किरण मोरे यांच्या अकादमीचे नियम बदलले आणि सर्व वयोगटातील मुलांना प्रशिक्षण देण्याची परवानगी देण्यात आली.

3 इरफान पठाण ने दिली बॅट

पंड्या बंधूंच्या घरची परिस्थिती सर्वांना परिचित आहे. त्यांची स्थिती इतकी खराब होती की, त्यांच्याकडे बॅट घेण्यासाठी देखील पैसे पुरेसे नव्हते. 2014 विजय हजारे ट्रॉफी मॅचदरम्यान त्याने इरफान पठाण (Irfan Pathan) याच्याकडून बॅट मागितली आणि पठाणने त्याची मदत करत आपली बॅट त्याला दिली.

4 मुंबई इंडियन्सने बदलले आयुष्य

2015 इंडियन प्रीमिअर लीगमध्ये नीता अंबानी यांच्या मालकीच्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून खेळताना हार्दिकचे आयुष्य बदलले. 2015 च्या पहिल्या लिस्ट-ए ट्रायलदरम्यान पूर्वीचे प्रशिक्षक जॉन राईट (John Wright) यांची नजर हार्दिकवर पडली. राईटने पंड्याला ट्रायलसाठी बोलावले. आणि त्याच्यानंतर मुंबई फ्रँचायझीने हार्दिकला बेस प्राईजवर टीममध्ये समावेश केला.

5 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये एका ओव्हरमध्ये केला सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम

2016 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Sayyed Mushtaq Ali Trophy) मध्ये दिल्लीविरुद्ध झालेल्या गट सी सामन्यादरम्यान बडोद्याकडून खेळणार्‍या हार्दिकने आकाश सुदानच्या षटकात 39 धावा ठोकल्या. दिल्ली संघाचा मध्यमगती गोलंदाज आकाश सुदान याच्या एका ओव्हरमध्ये हार्दिकने 39 धावा फडकावलया. सुदानच्या या ओव्हरमध्ये हार्दिकने 5 षटकार आणि एक चौकार ठोकला होता. पंड्याने एका ओव्हरमध्ये केलेल्या 39 धावा हा अजूनही टी-20 क्रिकेटमधील एक न मोडला गेलेला विश्वविक्रम आहे.

हार्दिक सध्या दुखापतीमुळे काही काळ खेळू शकणार नाही. आणि पुढील वर्षी आयपीएलमधून क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याची शक्यता आहे. हार्दिक आणि भाऊ कृणालने परिस्थितीवर मात करत क्रिकेट विश्वात आपले वेगळे स्थान मिळवले आहेत. एकीकडे, हार्दिक टीम इंडियाच्या वनडे, टी-20 आणि टेस्ट संघाचा भाग आहे. दुसरीकडे, कृणालने आजवर मर्यादित षटकारांच्या क्रिकेटसाठी भारतीय संघात स्थान मिळवले आहेत.