MI vs GT (Photo Credit - X)

Gujarat Titans vs Mumbai Indians: आयपीएल 2025  (IPL 2025) नववा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद (Narendra Modi Stadium, Ahmedabad) येथे खेळवला जात आहे. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सला पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत, दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक असणार आहे. म्हणूनच आजचा सामना मनोरंजक असेल. गुजरातचे कर्णधारपद शुभमन गिलकडे आहे. तर, मुंबईची कमान हार्दिक पांड्याकडे आहे. त्याआधी, मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंगाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने मुंबईसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

साई सुदर्शनने 63 धावांची शानदार खेळी

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने 20 षटकात 7 गडी गमावून 196 धावा केल्या. गुजरातकडूनन साई सुदर्शनने 63 धावांची शानदार खेळी केली. त्याने 41 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याच्याशिवाय जाॅस बटलरने 39 तर कर्णधार शुभमन गिलने 38 धावांचे योगदान दिले. (हे देखील वाचा: Shubman Gill Milestone: शुभमन गिलने मोडला डेव्हिड वॉर्नरचा मोठा विक्रम, 'या' बाबतीत गेला पुढे)

हार्दिक पांड्याने घेतल्या सर्वाधिक 2 विकेट्स

दुसरीकडे, कर्णधार हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्या व्यतिरिक्त ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, मुजीब उर रहमान आणि सत्यनारायण राजू यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.