
Gujarat Titans vs Mumbai Indians: आयपीएल 2025 (IPL 2025) नववा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (Gujarat Titans vs Mumbai Indians) यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद (Narendra Modi Stadium, Ahmedabad) येथे खेळवला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव करुन विजयाची नोंद केली आहे. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव आहे. त्याआधी, मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने मुंबईसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईचा संघ 20 षटकात 6 गडी गमावून 160 धावा करु शकला.
Gujarat Titans continue their winning streak against MI at home 👏
Hardik Pandya's side have now lost their first two #IPL2025 games ❌ https://t.co/FCU7uR1H7U #GTvMI pic.twitter.com/XSagvQ9Ddd
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) March 29, 2025
साई सुदर्शनची 63 धावांची शानदार खेळी
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने 20 षटकात 7 गडी गमावून 196 धावा केल्या. गुजरातकडूनन साई सुदर्शनने 63 धावांची शानदार खेळी केली. त्याने 41 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याच्याशिवाय जाॅस बटलरने 39 तर कर्णधार शुभमन गिलने 38 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्या व्यतिरिक्त ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, मुजीब उर रहमान आणि सत्यनारायण राजू यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या.
मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाची शानदार गोलंदाजी
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघ 20 षटकांत सहा विकेट गमावल्यानंतर फक्त 160 धावाच करू शकला. मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक 48 धावांची खेळी खेळली. या धमाकेदार खेळीदरम्यान, सूर्यकुमार यादवने 28 चेंडूत एक चौकार आणि चार षटकार मारले. सूर्यकुमार यादव व्यतिरिक्त तिलक वर्माने 39 धावा केल्या. त्याच वेळी, गुजरात टायटन्सकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्याव्यतिरिक्त, रविश्रीनिवासन साई किशोर आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.