
Sunrisers Hyderabad vs Gujarat Titans, 19th Match: टाटा आयपीएल 2025 चा (TATA IPL 2025) 19 वा (Indian Premier League 2025) सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स (SRH vs GT) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad) खेळवला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्स 7 गडी राखून सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला आहे. हैदराबादचा हा सलग चौथा पराभव आहे. त्याआधी, गुजरातने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने गुजरातसमोर 153 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातने 20 षटकात 3 गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.
3️⃣ wins on the trot 💙
A commanding 7️⃣-wicket win over #SRH takes #GT to the second spot in the #TATAIPL 2025 points table 🆙
Scorecard ▶ https://t.co/Y5Jzfr6Vv4#SRHvGT | @gujarat_titans pic.twitter.com/tYB1Dt5mdd
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2025
मोहम्मद सिराजची घातक गोलंदाजी
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हैदराबादने 20 षटकात 8 गडी गमावून 152 धावा केल्या. हैदराबादकडून नितीश कुमार रेड्डीने 31 धावांची सर्वाधिक खेळी केली. त्याने 34 चेंडूत 3 चौकार मारले. त्याच्याशिवाय हेनरिक क्लासेनने 27 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, गुजरात टायटन्स संघाकडून गोलंदाजीत मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 गडी बाद केले. त्याच्याशिवाय प्रसीध कृष्ण आणि रविश्रीनिवासन साई किशोरने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
शुभमन गिलची 61 धावांची धमाकेदार खेळी
त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्स संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 153 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक 61 धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने 43 चेंडूत 9 चौकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त, वॉशिंग्टन सुंदरने 49 धावा केल्या. त्याच वेळी, सनरायझर्स हैदराबादकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.