
R Praggnanandhaa: भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदाने (R Praggnanandhaa) अलिरेझा फिरोजा आणि मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्ह यांच्याविरुद्ध टायब्रेक प्लेऑफ सामना जिंकून सुपरबेट बुद्धिबळ क्लासिक स्पर्धा (Superbet Chess Classic 2025) जिंकली. नऊ फेऱ्यांनंतर प्रज्ञानंद, वाचियर-लाग्रावे आणि फिरोज्झा यांचे गुण 5.5 इतके होते. ज्यामुळे विजेत्याचा निर्णय टायब्रेकरमध्ये झाला. पहिले दोन सामने टायब्रेकरमध्ये ड्रॉ झाल्यानंतर, प्रज्ञानंदाने तिसरा सामना जिंकत विजेतेपद जिंकले.
अंतिम फेरीपर्यंत आर. प्रज्ञानंद स्पर्धेत खूप पुढे होता. पण लेव्हॉन अॅरोनियनविरुद्धच्या त्याच्या ड्रॉमुळे फिरोजा आणि वाचियर-लाग्रावे यांनी त्यांचे शेवटचे गेम जिंकून बरोबरी साधली. टायब्रेकमधील पहिले दोन सामने (प्रज्ञानानंद-फिरोज्जा आणि वाचियर-लाग्रेव्ह-फिरोज्जा) बरोबरीत सुटले. तिसऱ्या गेममध्ये विजय मिळवला. प्रज्ञानंदाने चमकदार कामगिरी केली आणि वाचियर-लाग्रेव्हला पराभूत केले.
विजयानंतर, प्रज्ञानंदाने इंस्टाग्रामवर भावना व्यक्त केल्या, “अविश्वसनीय अनुभव, बुखारेस्टमध्ये नुकतीच सुपरबेट बुद्धिबळ क्लासिक स्पर्धा जिंकली. माझ्या टीम आणि सहकाऱ्यांनी सतत दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल त्यांचे आभार." भारताचा विश्वविजेता डी गुकेश चार गुणांसह नवव्या स्थानावर राहिला. आता ग्रँड चेस टूरची पुढील स्पर्धा, सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ, 1 जुलैपासून क्रोएशियामध्ये खेळली जाईल.