IND vs SL 2nd T20: हार्दिक पांड्यासाठी आनंदाची बातमी, सामन्यापूर्वी घातक गोलंदाज तंदुरुस्त
Hardik Pandya (Photo Credit - Twitter)

IND vs SL 2nd T20 ODI: हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारताचा आज श्रीलंकेशी दुसरा टी-20 सामना होणार (IND vs SL 2nd T20) आहे, तेव्हा त्यांची नजर मालिका जिंकण्यावर असेल. संजू सॅमसन (Sanju Samson) दुखापतीमुळे आज खेळू शकणार नाही, पण यासोबतच टीम इंडियासाठी (Team India) एक आनंदाची बातमीही आली आहे. अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) दुस-या सामन्यासाठी तंदुरुस्त झाला आहे आणि आज तो प्लेइंग 11 मध्ये सामील होऊ शकतो. आज हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (MCA) होणार आहे, हा सामना श्रीलंकेसाठी करा किंवा मरो असा आहे. आज भारताने विजय मिळवला तर मालिका आपल्या नावावर होईल. संजू सॅमसन संघाबाहेर असल्याने प्लेइंग 11 मध्ये आज बदल होणार हे नक्की. भारताच्या प्लेइंग 11 मध्ये 2 बदल शक्य आहेत.

अर्शदीप सिंह तंदुरुस्त

अर्शदीप सिंह प्रकृती अस्वास्थ्यामुळे पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. अर्शदीप सिंह हा सामना खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता, पण आता तो तंदुरुस्त आहे. अर्शदीप सिंहच्या जागी हर्षल पटेलला प्लेइंग 11 मधून वगळले जाऊ शकते. संजू सॅमसनच्या जागी राहुल त्रिपाठीला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. (हे देखील वाचा: IND vs SL 2nd T20 Live Streaming Online: तीन वर्षांनंतर भारतीय संघ पुण्यात खेळणार टी-20 सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार लाइव्ह)

दुसऱ्या सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेईंग XI

इशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, शिवम मावी, उमरान मलिक, युझवेंद्र चहल