T20 World Cup 2024 Live Streaming: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! टी-20 विश्वचषकाचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल विनामूल्य, संपूर्ण तपशील घ्या जाणून
Team India (Photo Credit - Twitter)

T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) 1 जूनपासून यूएसए (USA) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होणार आहे. दरम्यान, आनंदाची बातमी अशी आहे की चाहते मोबाईलवर मेगा इव्हेंट पूर्णपणे विनामूल्य पाहू शकतात. डिस्ने प्लस हॉटस्टारने (Disney Plus Hotstar) टी-20 विश्वचषकाचे मोफत स्ट्रीमिंग दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारने नुकतीच टी-20 विश्वचषक 2024 संदर्भात माहिती प्रसिद्ध केली आहे. स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल फोनवर अगदी मोफत पाहता येईल. तर, मोठ्या स्क्रीनवर, सदस्यता आवश्यक असेल. याशिवाय या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण फक्त स्टार स्पोर्ट्सवर दाखवले जाणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

भारताची मोहीम 5 जूनपासून सुरू होणार आहे

बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ 5 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामनाही येथे होणार आहे. (हे देखील वाचा: Yuvraj Singh With T20 WC 2024 Trophy: ICC T20 विश्वचषकाचा ब्रँड ॲम्बेसेडर युवराज सिंगने मियामी GP येथे ट्रॉफीसोबत दिल्या पोझ)

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.