Glenn Maxwell Takes Indefinite Break: ग्लेन मॅक्सवेल याची IPL 2024 मधून अनिश्चित काळासाठी माघार; RCB संघातील अष्टपैलू क्रिकेटपटूच्या निर्णयामागे नेमके कारण काय?
Glenn James Maxwell | (Photo credit: archived, edited, representative image)

Glenn James Maxwell News: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 हंगाम ऐन भरात असताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघातील खेळाडू ऑस्ट्रेलियन अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल याने अनिश्चित काळासाठी विश्रांती घेत असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे त्याने 'मानसिक आणि शारीरिक' स्थिरतेसाठी विश्रांती आवश्यक असल्याने आपण ती घेत असल्याचे म्हटले आहे. पाठिमागील काही काळापासून मॅक्सवेल याची आयपीएलमधील कामगिरीही तशी सुमार किंवा अगदी खराब म्हणावी अशी राहिली आहे. त्यामुळेही तो टीकेचा धनी बनला होता. अशातच त्याचा हा निर्णय आल्याने या विश्रांतीमागे खराब कामगिरी तर नाही ना? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. महत्त्वाचे म्हणजे, सोमवारी (15 एप्रिल) रात्री सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात आरसीबी संघास पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मॅक्सवेलने आपला निर्णय जाहीर केला. (Indian Premier League 2024)

मॅक्सवेल याची खराब कामगिरी

आयपीएल 2024 हंगामात मॅक्सवेल याला विशेष अशी कामगिरी दाखवता आली नाही. खास करुन यंदा त्याच्या फलंदाजीस म्हणावी तशी धार पाहायला मिळाली नाही. त्यामुळे त्याच्यावर चौफेर टीका होत आहे. अलिकडेच झालेल्या SRH विरुद्धच्या सामन्यातही XI त्याची हजेरी पाहाला मिळाली नाही. उलट त्याच्याऐवजी विल जॅक्सने याला संधी मिळाली. प्रसारमाध्यमांशी बोलताना, ग्लेन मॅक्सवेलने स्पर्धेपासून अनिश्चित काळासाठी दूर होण्याच्या निर्णयाचे प्राथमिक कारण "मानसिक आणि शारीरिक" विश्रांती असल्याचे सांगितले. (हेही वाचा, Glenn Maxwell Hospitalised: ग्लेन मॅक्सवेल रुग्णालयात दाखल, अतीमद्यप्राशन केल्याने वैद्यकीय उपचारांची वेळ)

आरोग्याला प्राधान्य

अनुभवी अष्टपैलू खेळाडूने त्याच्या आरोग्याला प्राधान्य देण्याच्या गरजेवर भर दिला. तसेच, आपल्याऐवजी इतरकोणत्या खेळाडूला संधी मिळण्यासाठी वाटही मोकळी करुन दिली. आपला निर्णय जाहीर करताना त्याने लवकरच आपण पुनरागमन करु आणि संघाच्या कामगिरीमध्ये सकारात्मक योगदान देऊ असेही म्हटले.

एक्स पोस्ट

दरम्यान, मानसिक थकव्यामुळे मॅक्सवेलने विश्रांतीसाठी विशेष वेळ काढण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही त्याने अशा प्रकारे विश्रांती घेतली आहे. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेट दिग्गज सुनील गावस्कर यांनी यापूर्वी मॅक्सवेलच्या आयपीएलमधील कामगिरीवर, विशेषत: वेगवान गोलंदाजीववर टीका केली होती. तो वेगवान गोलंदाजी खेळण्यास सक्षम नाही. या आयपीएल दरम्यान तो वेगवान गोलंदाजी खेळू शकला नाही. तसेच, छातीपेक्षा अधीक उंचावरुन येणारे उसळी चेंडू त्याला त्रास देतात. जे त्याला खेळात येत नाही. केवळ कमरेच्या उंचीच्या काली आलेले चेंडूच तो योग्यपणे खेळू शकतो. पण त्यातही त्याची फटकेबाजी विशेष नसते असे गावस्कर यांनी म्हटले होते.