Indian Cricket Team Head Coach: भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाशी संबंधित मोठी माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, माजी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीर (Gautam Gambhir) मुख्य प्रशिक्षक होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. जूनच्या अखेरीस याची औपचारिक घोषणा केली जाईल. याशिवाय गौतम गंभीरला सपोर्ट स्टाफ निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. वास्तविक, टी-20 विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा (Rahul Dravid) प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. यानंतर राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक होणार हे निश्चित मानले जात आहे. गौतम गंभीरचा कार्यकाळ एकदिवसीय विश्वचषक 2027 पर्यंत असेल. (हे देखील वाचा: T20 World Cup 2024 Super-8 Schedule: टी-20 वर्ल्डकपच्या सुपर-8 मध्ये कधी कुठे अन् कोणत्या संघासोबत होणार सामना? जाणून घ्या सुपर-8 चे संपूर्ण वेळापत्रक)
BCCI is set to announce Gautam Gambhir as Team India Head Coach by the end of this Week.
Gambhir will select his support staff, which included bowling Coach,batting Coach and fielding Coach. pic.twitter.com/LI2LHG1Avm
— Sujeet Suman (@sujeetsuman1991) June 16, 2024
गौतम गंभीरच्या नावावर शिक्कामोर्तब!
नुकतेच कोलकाता नाईट रायडर्सने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. कोलकाता नाईट रायडर्सच्या विजयात गौतम गंभीरचे योगदान महत्त्वाचे मानले जात होते. वास्तविक, याआधी व्हीव्हीएस लक्ष्मण, स्टीफन फ्लेमिंग, जस्टिन लँगर, अँडी फ्लॉवर आणि रिकी पॉन्टिंग यांसारखी नावे पुढे आली होती, पण पुढे काही झाले नाही. यानंतर बीसीसीआयची पहिली पसंती म्हणून गौतम गंभीर समोर आला. त्याचवेळी गौतम गंभीरने भारताचे मुख्य प्रशिक्षक होण्यात रस दाखवला, त्यानंतर या माजी भारतीय क्रिकेटपटूच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. मात्र, अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
गौतम गंभीर स्वतःचा सपोर्ट स्टाफ निवडणार...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतम गंभीरची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर सपोर्ट स्टाफमध्येही बदल करण्यात येणार आहेत. गौतम गंभीरला त्याच्या आवडीचे सपोर्ट स्टाफ निवडण्याचे स्वातंत्र्य असेल, असे मानले जात आहे. मात्र, या महिन्याच्या अखेरीस गौतम गंभीरच्या नावाला अधिकृत मान्यता मिळेल. मात्र, गौतम गंभीरच्या कार्यकाळात भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.