ICC T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 मधील (T20 World Cup 2024) सुपर-8 चा (Super -8) थरार 19 जून पासून खेळवला जाणार आहे. ग्रुप स्टेजमधील 20 संघांने प्रत्येकी चार सामने खेळले असुन 8 संघांनी सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. सुपर-8 साठी भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडिज, अमेरिका आणि इंग्लंड पात्र ठरले आहे. तसेच, बांगलादेश सुपर-8 साठी पात्र होण्यासाठी शेवटचा संघ असु शकतो. दरम्यान, सुपर-8 मध्ये कोणता संघ कोणाशी भिडणार आहे हे जाणून घेणार आहोत. (हे देखील वाचा: T20 World Cup 2024: भारतीय संघातील 'या' तीन खेळाडूंचा असू शकतो शेवटचा टी-20 विश्वचषक? संघातून बाहेर पडणे जवळपास निश्चित)
सुपर-8 संघांचे दोन गटात विभागणी
सुपर-8 फेरीत आठ संघाना दोन ग्रुप मध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक संघ 3-3 सामने खेळणार आहे. तसेच, दोन्ही ग्रुपमध्ये टॉप-2 मध्ये जे संघ असतील ते सेमीफायनलसाठी पात्र ठरतील. त्यानंतर 29 जूनला अंतिम सामना खेळवला जाईल.
Only one Super Eight spot is up for grabs after Scotland were knocked out of the #T20WorldCup 👀
➡ https://t.co/9pDc0Su8Po pic.twitter.com/mEAzivEBua
— ICC (@ICC) June 16, 2024
जाणून घ्या प्रत्येक संघांचे सुपर-8 चे संपूर्ण वेळापत्रक
सुपर-8 मध्ये अमेरिकेचे सामने
- अमेरिका विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 19 जून
- अमेरिका विरुद्ध वेस्ट इंडिज -21 जून
- अमेरिका विरुद्ध इंग्लंड - 23 जून
सुपर-8 मध्ये वेस्ट इंडिजचे सामने
- इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज - 19 जून
- अमेरिका विरुद्ध वेस्ट इंडिज - 21 जून
- वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 23 जून
सुपर-8 मधील दक्षिण आफ्रिकेचे सामने
- अमेरिका विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 19 जून
- इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 21 जून
- वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 23 जून
सुपर-8 मधील अफगाणिस्तानचे सामने
- अफगाणिस्तान विरुद्ध भारत - 20 जून
- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया - 22 जून
- अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश/नेदरलँड्स - 24 जून
सुपर-8 मधील इंग्लंडचे सामने
- इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज - 19 जून
- इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 21 जून
- अमेरिका विरुद्ध इंग्लंड - 23 जून
सुपर-8 मधील भारताचे सामने
- अफगाणिस्तान विरुद्ध भारत - 20 जून
- भारत विरुद्ध बांगलादेश/नेदरलँड - 22 जून
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - 24 जून
सुपर-8 मधील ऑस्ट्रेलियाचे सामने
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश/नेदरलँड्स - 20 जून
- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया - 22 जून
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत - 24 जून
सुपर 8 चे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार, जाणून घ्या काय असेल वेळ
आम्ही तुम्हाला सांगतो की सुपर-8 चे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळले जातील. सुपर-8 चे काही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता तर काही सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता खेळवले जातील. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे भारताचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून खेळवले जातील.
सुपर-8 गट -
सुपर-8 गट-1
अफगाणिस्तान
भारत
ऑस्ट्रेलिया
बांगलादेश/नेदरलँड
सुपर-8 गट- 2
अमेरिका
इंग्लंड
दक्षिण आफ्रिका
वेस्ट इंडिज