Photo Credit- X

Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने रविवारी आंध्र प्रदेशातील तिरुमला येथे श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात पूजा केली. भारतीय संघ लवकरच इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यात संघाला विजय मिळावा यासाठी सर्वच प्रयत्न करत आहेत. त्यातच अडचण म्हणून दोन महत्त्वाच्या खेळाडूंनी रोहीत आणि विराट यांनी कसोटीमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे संघापुढे कर्णधारपदी आणि दोघांच्या जागी योग्य खेळडू निवडण्याचा मोठा पेच उभा राहील आहे. देशाच्या आणि टीम इंडियाच्या उज्ज्वल भविष्यासाठी भगवान वेंकटेश्वराच्या चरणी आशीर्वाद मागितले.

गौतम गंभीर श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात पोहोचले

गंभीर मंदिरात पोहोचताच मंदिर प्रशासनाने त्यांचे पारंपारिक स्वागत केले. पुरोहितांनी त्याला विधीनुसार दर्शन दिले. मंदिरातील पूजेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये पुजारी गंभीरला दर्शन आणि पूजा करताना दिसत आहे. हेही वाचा: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीर आणि त्यांच्या पत्नीने सिद्धिविनायक मंदिरात केली प्रार्थना, व्हिडिओ व्हायरल

गौतम गंभीर देवाच्या दारात पोहोचला

गौतम गंभीर बद्दल जाणून घ्या

गौतम गंभीर हा माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे आणि सध्या तो भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. तो डावखुरा सलामीवीर फलंदाज आहे ज्याने अनेक महत्त्वाच्या प्रसंगी भारताला विजय मिळवून दिला आहे. 2007 मध्ये टी-20 विश्वचषक आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, गंभीरने राजकारणात प्रवेश केला आणि 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) खासदारही झाला. क्रिकेट क्षेत्रासोबतच, तो सामाजिक आणि राष्ट्रीय मुद्द्यांवरही आपले मत व्यक्त करण्यात नेहमीच सक्रिय राहिला आहे.