हनुमा विहारी व आर अश्विन (Photo Credit: Instagram)

Cricketers Turned COVID Warriors: कोविड-19 महामारीने (COVID-19 Pandemic) देशातील लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे आणि लोक मदतीसाठी सोशल मीडिया व्यासपीठाकडे वळले आहेत. या संकट काळात भारतात देवाचा दर्जा मिळवलेले क्रिकेटपटू आपल्या जबाबदारीपासून दूर राहिले नाहीत. त्यापैकी बरेचजण COVID योद्धा बनले आहेत आणि सर्वात जास्त आवश्यक असलेल्या लोकांच्या कामी येण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), हनुमा विहारी (Hanuma Vihari) पासून शिखर धवन आणि रविचंद्रन अश्विन या सर्वांनी तोंडावर मास्क परिधान करणे आणि वैयक्तिक स्वच्छता राखण्याबाबत सतत जागरूकता निर्माण केली आहे तर काहींनी पीडितांना आर्थिक मदत केली आहे. (Virat Kohli, Ishant Sharma यांनी आज घेतला कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस; नागरिकांनाही लसीकरणात सहभागी होण्याचं आवाहन)

विराटने पत्नी अनुष्का शर्मा समवेत 11 कोटी रुपये जमा केले, तर विहारीने इंग्लंडमध्ये काऊन्टी क्रिकेट खेळत असताना तेलंगणातील लोकांना महत्वाच्या वैद्यकीय संसाधने आणि रुग्णालयाच्या बेड शोधण्यासाठी व्हाट्सएप ग्रुप तयार केला. आज आपण कोविड योद्धा बनलेल्या 5 भारतीय स्टार क्रिकेटपटुंबाबत जाणून घेणार आहोत.

विराट कोहली (Virat Kohli)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या सोशल मीडियाद्वारे वैयक्तिक स्वच्छता, मास्क घालण्याचे महत्त्व आणि सामाजिक अंतर राखण्याच्या महत्वाबाबत कोहलीने नियमितपणे जनजागृती केली. आयपीएल 2021 स्थगित झाल्यावर त्याने जनसमुदाय मोहीम सुरू केली आणि ऑक्सिजन टाकी आणि वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी दोन कोटी रुपयांची देणगी दिली. इतकंच नाही तर त्याने पत्नी अनुष्का शर्मासह संयुक्त मोहिमेने 7 दिवसात 11.38 कोटी रुपये जमा केले.

हनुमा विहारी (Hanuma Vihari)

माध्यमांच्या नजरेत न येता पुढाकाराने मदत करण्याचे काम विहारीने केले आहे. जेव्हा देशात परिस्थिती वेगाने बिकट होत होती तेव्हा भारत कसोटीचा फलंदाज इंग्लंडमध्ये काऊन्टी क्रिकेट खेळत होता पण तो मागे हटला नाही. विहारीने तेलंगणातील कोविड-19 रुग्णांच्या मदतीसाठी वैद्यकीय संसाधने पुरवण्यासाठी करण्यासाठी एका स्वयंसेवकांच्या नेटवर्कसह WhatsApp ग्रुप तयार केला.

शिखर धवन (Shikhar Dhawan)

आयपीएल 2021 मधून मिळालेली वैयक्तिक बक्षिसाची रक्कम प्लाझ्मा बँकेला देण्याची घोषणा करण्यापासून धवन संकटकाळात अनेकांना मदतीचा हात देताना प्रसिद्धीपासून दूर राहिला. नुकतंच त्याने शुक्रवारी कोविड-19 लढ्यात गुरुग्राम पोलिसांना ऑक्सिजन दान केले.

रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)

संपूर्ण कुटुंब क्वारंटाईन असताना भारताचा स्टार फिरकी गोलंदाज अश्विन आयपीएल 2021 मधेच सोडून घरी परतला पण तो हातावर हात धरून बसला नाही. समाजातील गरीबांपर्यंत पोहोचण्यासाठी,मदतीसाठी इतरांशी समन्वय साधण्यासाठी त्वरित ट्विट रीट्वीट करण्यापासून त्याने हिरोची कॅप परिधान केली. त्याचे ट्विटर नाव भारतीय क्रिकेटपटू किंवा कोणतीही वैयक्तिक कामगिरीदेखील दर्शवित नाही. त्याऐवजी ते म्हणतात, “मास्क घाला आणि आपली लस घ्या”.

इरफान आणि युसुफ पठाण (Irfan and Yusuf Pathan)

भारतीय अष्टपैलू इरफान आणि युसुफ पठाण सुरुवातीपासून कोरोनाविरुद्ध लढ्यात सक्रिय राहिले आहेत. कोविड-19च्या सुरुवातीच्या काळात गरजूंना मास्क दान करण्यापासून दुसऱ्या लाटेच्या संकट काळात लोकांना फ्री जेवण देण्यापासून पठाण बंधू नेहमीच पुढे उभे राहिले आहेत.