वकार यूनुस (Photo Credit: Getty)

जगाशी संपर्क साधण्याचा सोशल मीडिया जितका सोपा मार्ग प्लॅटफॉर्मवर जाणवतो तितका थोड्या निष्काळजीपणामुळे एखाद्याला वाईट सहन अनुभवही सहन करावा लागतो. पाकिस्तानचा (Pakistan) माजी वेगवान गोलंदाज वकार युनूस (Waqar Younis) यांनाही असाचा काहीसा वाईट अनुभव आला ज्यामुळे त्यांनी स्वत: ला सर्व प्रकारच्या सोशल मीडियापासून दूर करण्याचे जाहीर केले आहे. शुक्रवारी सकाळी पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अश्‍लील व्हिडिओ क्लिप पसंत केल्याचा आरोप हॅकरवर केला आणि आपली सोशल मीडियावरून बाहेर पडण्याची घोषणा केली. वकारने सर्व क्लिप डिलीट केल्या आहेत.  त्यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्यामुळे व त्यातून एक अश्लील क्लिप पसंत झाल्यामुळे त्यांनी स्वत: ला सोशल मीडियापासून दूर करण्याचे ठरविले असल्याचे वकार यांनी सांगितले. वकार युनूस यांनी आज पहाटे सातच्या सुमारास एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि सोशल मीडियावर पुन्हा कधीही दिसणार नाही असे सांगत या संपूर्ण घटनेचा उल्लेख केला. ('राजकारण करायचंय तर क्रिकेट सोड'! पंतप्रधान मोदींवरील विधानावर दानिश कनेरियाने शाहिद आफ्रिदीला खडसावलं)

त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याची ही पहिली वेळ नाही असेही वकार यांनी सांगितले. वकार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ संदेश जारी केला, "आज मला मोठ्या खेदाने म्हणावे लागेल की आज सकाळी उठल्यावर कोणीतरी माझे ट्विटर अकाउंट हॅक केले आणि माझ्या खात्यातून किळसवाणे व्हिडिओ लाईक केले."

"म्हणून ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, ही अत्यंत खेद आणि अस्वस्थतेची बाब आहे. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठीही. मला असे वाटायचे की सोशल मीडिया किंवा ट्विटर हा लोकांशी संवाद साधण्याचा एक मार्ग आहे. पण दुर्दैवाने या माणसाने सर्व काही उध्वस्त केले. तसे, हॅकरने प्रथमच हे केलेले नाही. तीन किंवा चार वेळा माझे अकाउंट हॅक केले आहे. ही व्यक्ती इथे थांबणार आहे असे मला वाटत नाही, म्हणून मी ठरवले आहे की आजनंतर मी सोशल मीडियावर येणार नाही. मला माझ्या कुटुंबावर जास्त प्रेम आहे. आज नंतर तुम्ही मला सोशल मीडियावर पाहणार नाही, यामुळे कुणाला त्रास मी पुन्हा सर्वांची माफी मागतो, " वकारने म्हटले.