Shikhar Dhawan (Photo Credit - Twitter)

Most Runs In ICC Champions Trophy: पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती येथे 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) सुरू होईल. तर, अंतिम सामना 9 मार्च रोजी खेळला जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवव्या आवृत्तीत आठ संघ एकूण 15 सामने खेळतील. आठ संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांना गट ब मध्ये स्थान देण्यात आले. त्यापैकी अव्वल 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील, त्यानंतर विजेत्यांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल. अशा परिस्थितीत, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांची नावे जाणून घेऊयात.

1. ख्रिस गेल (वेस्ट इंडिज)

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात ख्रिस गेल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. ख्रिस गेलने 17 सामन्यांमध्ये 52.73 च्या सरासरीने आणि 88.77 च्या स्ट्राईक रेटने 791 धावा केल्या. या काळात त्याने तीन शतके आणि एक अर्धशतक झळकावले. ख्रिस गेलचा सर्वोत्तम स्कोअर 133 आहे.

2. महेला जयवर्धने (श्रीलंका)

श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 22 सामन्यांमध्ये 41.22 च्या सरासरीने आणि 84.80 च्या स्ट्राईक रेटने 742 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये पाच अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, महेला जयवर्धनेचा सर्वोत्तम स्कोअर 84 धावा आहे.

3. शिखर धवन (भारत)

भारतीय संघाचा माजी सलामीवीर शिखर धवन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. धवनने 10 सामन्यांमध्ये 77.88 च्या सरासरीने आणि 101.59 च्या स्ट्राईक रेटने 701 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये तीन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

4. कुमार संगकारा (श्रीलंका)

या यादीत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा चौथ्या क्रमांकावर आहे. संगकाराने 22 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे आणि 37.94 च्या सरासरीने आणि 71.36 च्या स्ट्राईक रेटने 683 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये फक्त एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. या काळात त्याचा सर्वोत्तम स्कोअर 134 आहे.

5. सौरव गांगुली (भारत)

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या 13 सामन्यांमध्ये 73.88 च्या सरासरीने आणि 83.12 च्या स्ट्राईक रेटने 665 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने 3 शतके आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत. सौरव गांगुलीचा 141धावा हा सर्वोत्तम धावसंख्या आहे.