Boxing Day Test 2020: सुपर शनिवार! क्रिकेट चाहत्यांना एकाच दिवशी मिळणार तीन बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यांची मेजवानी
भारत-ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड (Photo Credit: Twitter/ICC)

Boxing Day Test 2020: जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी शनिवार, 26 डिसेंबरचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या एकाच दिवशी जगभरातील चाहत्यांना तीन सामने पाहण्याची संधी लाभणार आहे. या दिवशी 6 संघ एकमेकांविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामना खेळताना दिसतील. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी बॉक्सिंग डे कसोटी सामन्यांची सुरुवात होईल. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) अंतर्गत हा सामना खेळला जाणार आहे. या दिवशी पहिला सामना न्यूझीलंड (New Zealand)-पाकिस्तान (Pakistan), नंतर ऑस्ट्रेलिया(Australia)-भारत (India) आणि अखेरीस दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघात खेळला जाणार आहे. अशा प्रकारे क्रिकेट  दिवशी तीन बॉक्सिंग डे सामन्यांची मेजवानी मिळणार आहे. न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात टी-20 मालिकेनंतर पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे, तर इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका कोरोना व्हायरसमुळे रद्द झाल्यावर दक्षिण आफ्रिका संघ पहिल्यांदा मैदानावर उतरणार आहे. यजमान आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळली जाणार आहे. (IND vs AUS 2nd Test 2020: बॉक्सिंग-डे टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया गाठणार शंभरी, MCG मध्ये भारत- कांगारू संघात रंगणार खास सामना)

दुसरीकडे, भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा दुसरा कसोटी सामना असेल. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर दोन्ही संघ बॉक्सिंग डे कसोटीसाठी मैदानावर उतरतील. चार सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये कांगारू संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अ‍ॅडिलेड येथील पहिल्या सामन्यात लज्जास्पद पराभवाला सामोरे गेलेल्या टीम इंडियापुढे मालिकेत पुनरागमन करण्याचे आव्हान असेल आणि ते देखील नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत. या सहा संघातील कसोटी सामने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळले जाणार आहेत. आयसीसीच्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर असून भारतावर आणखी एक पराभव झाल्यास तिसऱ्या स्थानावर घसरण्याची टांगती तलवार आहे. भारताला न्यूझीलंडकडून मोठा धोका आहेत, जे त्यांच्या मागे तिसऱ्या स्थानावर असून आगामी मालिका घरच्या मैदानावर खेळणार आहे.

लक्षात घेण्यासारखे म्हणजे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा या राष्ट्रकुल देशात ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवसाला बॉक्सिंग डे म्हटले जाते. या दिवसाचा इतिहास 128 वर्ष जुना आहे.