भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा जलवा क्रिकेटच्या मैदानावर जितका आहे तितकाच तो मैदानाबाहेरही आहे. सध्या भारतामध्ये वेस्ट इंडिज विरूद्ध भारत असे कसोटी सामने सुरू आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर मात केल्यानंतर आता दुसरी मालिकाही जिंकण्यासाठी भारत सज्ज आहे.
सकाळी मॅच सुरू झाल्यानंतर तासाभरातच सुरक्षा कवच तोडत एक चाहता विराट कोहलीजवळ पोहचला. अचानक घडलेला हा प्रकार सुरक्षा रक्षकांच्याही लक्षात आला नाही. विराटजवळ चाहता पोहचला, त्याने सेल्फी क्लिक करून विराटला मिठी मारण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र पुढील काही क्षणातच सुरक्षारक्षकांनी चाहत्याला तेथून दूर केले.
विराट कोहलीसोबत मैदानात सेल्फी क्लिक करण्यासाठी चाहते घुसण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत.