RR vs RCB (Photo Credit -X)

RR vs RCB, IPL 2024 19th Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 19 व्या सामन्यात शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना राजस्थान रॉयल्सशी (RCB vs RR) होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर (Jaipur Sawai Mansingh Stadium) हा सामना होणार आहे. लीगमधील दोन्ही संघांच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकली तर राजस्थान रॉयल्सने सर्व 3 सामने जिंकले आहेत आणि संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, आरसीबीने 4 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे आणि 3 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तुम्ही जिओ सिनेमावर ऑनलाइन स्ट्रीमिंग पाहू शकता.

राजस्थान रॉयल्सला आजच्या सामन्यात त्यांच्या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. दुसरीकडे ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, फाफ डू प्लेसिस या दिग्गजांनी सजलेल्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाने आतापर्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 28 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर रॉयल चॅलेंजर बंगळुरू गुणतालिकेत आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

आजच्या सामन्यात हे खेळाडू करु शकतात कहर

जोस बटलर: राजस्थान रॉयल्सचा स्फोटक सलामीवीर जोस बटलरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळणे आवडते. जोस बटलरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 37 च्या सरासरीने 412 धावा केल्या आहेत. जोस बटलर आजच्या सामन्यातही कहर करू शकतो.

युझवेंद्र चहल: राजस्थान रॉयल्सचा अनुभवी गोलंदाज युझवेंद्र चहलने सवाई मानसिंग स्टेडियमवर 13 सामने खेळले असून त्यात त्याने 17 बळी घेतले आहेत. आतापर्यंत युझवेंद्र चहल या स्पर्धेत चांगलाच फॉर्मात दिसत आहे. आजच्या सामन्यात युझवेंद्र चहलही विकेट घेऊ शकतो.

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रायन पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, शुभम दुबे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), रीस टोपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल, महिपाल लोमरोर.