John Edrich Passes Away: ख्रिसमस 2020 च्या पूर्वसंध्येला क्रिकेट विश्वाने इंग्लंडचा एक सर्वोत्कृष्ट फलंदाज गमावला. इंग्लंडचे महान कसोटी फलंदाज जॉन एड्रिच (John Edrich) यांचे नुकतेच 83व्या वर्षी निधन झाले. कठीण परिस्थितीत शानदार कामगिरी करण्याची कौशल्य असल्यामुळे जॉन यांना मानसिक बाळासाठी ओळखले जायचे. अँकर खेळी खेळायची असो वा खालच्या फळीतील खेळाडूंसह फलंदाजी करणे असो, एड्रिक प्रत्येक आव्हानाला यशस्वीरीत्या सामोरे गेले आहेत. 1937 मध्ये डेब्यू करणाऱ्याएड्रिक यांनी 77 कसोटी सामन्यांमध्ये 43 च्या सरासरीने 5138 धावा केल्या आहेत. त्याच्या सांख्यिकीय कामगिरीवरून हे दिसून येते की तो त्याच्या पिढीतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी होते आणि त्यांनी 1963 आणि 1976 दरम्यान इंग्लंडकडून एकूण 77 कसोटी सामने खेळले होते. इतकंच नाही तर 1965 मध्ये त्यांनी तिहेरी शतक झळकावत इंग्लंडसाठीचा पाचवी सर्वोच्च टेस्ट धावसंख्या नोंदवली.
एकदिवसीय क्रिकेट सुरुवातीच्या काळात, तिन्ही पहिला-वाहिला वनडे सामना खेळत आणि सर्वाधिक धावा केल्या. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 12 शतके आणि 24 अर्धशतके झळकावत न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 310 धावांची शानदार खेळी केली. कर्णधार माईक स्मिथ यांनी हेडींगले येथे डाव गोष्टीत करण्यापूर्वी जॉन यांनी न्यूझीलंडविरुद्ध एका डावात 52 चौकार आणि 5 षटकार ठोकर मैदानात चौफेर फटकेबाजी केली. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला चौकार ठोकणारा खेळाडू म्हणूनही त्यांची आठवण केली जाते. एड्रिक यांना 2000 मध्ये Waldenstrom म्हणून ओळखल्या जाणार्या दुर्मिळ आणि असाध्य, ल्युकेमिया प्रकाराचे निदान झाले आणि जगण्यासाठी सात वर्षे असल्याचे सांगण्यात आले. ख्रिसमसच्या अगोदरचे त्यांच्या दुःखद निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे आणि चाहत्यांनी व फॉलोवर्सने माजी दिग्गजांच्या आठवणी सामायिक केल्या. “एक कसोटी ट्रिपल सेंचुरीयन आणि सरे क्रिकेट लीजेंड. शांततेत विश्रांती घ्या,” माजी इंग्लिश क्रिकेटपटू मार्क बुचर यांनी ट्विट केले.
वनडेमधील पहिला चौकार
RIP John Edrich
Did you know he hit the very first boundary in One Day International cricket?
Here it is....MCG 1971 pic.twitter.com/vaj6TZ2VT0
— Rob Moody (@robelinda2) December 24, 2020
मार्क बुचर
Also, a test triple-centurion and @surreycricket legend #RIP https://t.co/YfnfxCwjBS
— mark butcher (@markbutcher72) December 24, 2020
2006–07 मध्ये त्यांनी सरे काउंटी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. 2012 मध्ये त्यांनी सांगितले की, मिस्टलेटो अर्कच्या इंजेक्शनद्वारे त्यांचा कर्करोगाने बरा झाला होता आणि ते आता तंदुरुस्त व सक्रिय आहेत.