European Cricket Series: क्रिकेटमध्ये कधीही काहीही घडू शकते असे म्हणतात, परंतु युरोपियन क्रिकेट मालिकेच्या (European Cricket Series) सामन्यादरम्यान घडलेली घटना यापूर्वी कधीच घडली नसेल. आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की विकेटकीपरच्या हातात चेंडू असूनही एका संघाने त्याच्या समोर 2 चोरट्या धावा घेतल्या आणि सामना बरोबरीत सोडवला. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे विकेटकीपर स्टंप्सपासून अवघ्या इंचाच्या अंतरावर होता परंतु असे असूनही तो फलंदाजाला धावबाद करू शकला नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. युरोपियन क्रिकेट मालिकेच्या कॅटलुनिया टायगर्स सीसी (Catalunya Tigers CC) आणि पाकसीलोना सीसी (Pakcelona CC) यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडली. युरोपियन क्रिकेट मालिकेदरम्यान पाकसिलोना क्रिकेट क्लबच्या फलंदाजांनी ज्याप्रकारे कॅटलानिया टायगर्सविरूद्ध सामना बरोबरीत रोखला होता तो खरोखरच चकित करणारा होता.
एका चेंडूत 3 धावांची गरज असताना कॅटालुनिया टायगर्सचा फलंदाज आदत अली फलंदाजी करत होता. त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट विकेटकीपरकडे गेला. तथापि, विकेटकीपर चेंडू गोळा करण्यात अयशस्वी झाल्यानेही त्याने बाई धाव घेतली. तथापि, सुरुवातीच्या गडबडीनंतर विकेटकीपरने चेंडू गोळा केल्यानंतरही आदत अलीने (Adat Ali) आपला दुसऱ्या टोकाला असलेल्या अझीम आझमला (Azeem Azam) धाव घेण्याचे आव्हान केले. आदतने नॉन-स्ट्रायकरला तो टोकापर्यंत पोहोचेपर्यंत दुसर्या टोकाला थांबण्याचे आव्हान दिले आणि दोघांनी चतुराईने एक चोरटी धाव घेत सामना बरोबरीत सोडवला. पाहा या विचित्र रनचा व्हिडिओ:
SCENES! 2 to tie off last delivery, ball in wicket keeper hands and need another run. WHAT TO DO?? 🏏🇪🇸 pic.twitter.com/xFQuaUOreu
— European Cricket (@EuropeanCricket) October 28, 2020
दरम्यान, दोन्ही संघांनी 10 ओव्हरमध्ये 107 धावा केल्याने सामना टाय झाला आणि विजेता ठरवण्यासाठी 'गोल्डन बॉल' नियम लागू करण्यात आला. युरोपियन क्रिकेट मालिकेत वापरल्या जाणार्या नियमानुसार, धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला 1 बॉलमध्ये 2 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतात. तथापि, पाकसेलोना गोल्डन बॉलमध्ये केवळ 1 धावा करू शकला आणि सामन्यात विजय मिळवत असतानाही त्यांनी तो गमावला.