SA vs ENG 1st Test: 'बॉक्सिंग-डे' टेस्ट मॅचसाठी मैदानात उतरताच जेम्स अँडरसन होणार सचिन तेंडुलकरबरोबर 'या' स्पेशल क्लबमध्ये सामिल
जेम्स अँडरसन (Photo Credit: Getty Images)

इंग्लंडचा (England) वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) सचिन तेंडुलकर आणि स्टीव्ह वॉ यांच्यासह एलिट क्लबमध्ये सामील होणार आहे. दक्षिण आफ्रिका (South Africa_ विरुद्ध बॉक्सिंग डे टेस्ट सामना अँडरसनचा इंग्लंडकडून 150 वा कसोटी सामना असेल. अनुभवी गोलंदाज दीर्घ काळाच्या दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. अँडरसन हा कसोटी इतिहासातील 150 सामने खेळणारा नववा खेळाडू बनेल. यामध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), स्टीव्ह वॉ (Steve Waugh) आणि जॅक कॅलिस (Jacques Kallis) यासारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे ऑगस्टमध्ये अ‍ॅशेस (Ashes) मालिकेदरम्यान अँडरसनला कॅल्फला दुखापत झाली होती. ज्यानंतर आता तो वर्षाच्या अखेरीस संघात पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. दरम्यान, स्टुअर्ट ब्रॉड आणि जोफ्रा आर्चर दोघांनाही फ्लू झाले असल्याने त्यांच्या प्लेयिंग एलेव्हनमध्ये निवडीबाबत शंका उपस्थित होत आहे. सर्व खेळाडू खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्यास इंग्लंड पूर्ण धोकादायक प्लेयिंग इलेव्हनसह खेळेल अशी अपेक्षा आहे.

2003 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध लॉर्ड्स येथे पाच विकेट घेत असताना अँडरसन केवळ 20 वर्षांचा होता. इतकेच नाही तर 37 वर्षीय अँडरसनने गेल्या महिन्यात 2021 च्या अखेरीस अ‍ॅशेस मालिका खेळल्याशिवाय आपण क्रिकेट सोडणार नाही असे सांगितले होते. इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने अँडरसनच्या खेळण्याची पुष्टी केली आणि तो चांगल्या लयीत असल्याचेही म्हणाला. अँडरसन आपल्या उर्वरित साथीदारांपूर्वी वेगवान गोलंदाजीच्या शिबिरासाठी दक्षिण आफ्रिकेला आधी यावे लागले होते. अँडरसनने बराच काळ आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही आणि तो आता मैदानात लवकरच दिसणार आहे.

अँडरसन हा इंग्लंडचा सर्वात यशस्वी कसोटी गोलंदाज आहे. त्याने 575 विकेट घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात सेंच्युरियन येथे 26 डिसेंबरपासून पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे.