England Cricket Team vs Australia National Cricket Team: इंग्लंड क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ या दोन दिग्गज संघामध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पाच सामन्यांची एक मालिका 2024 (ODI Series 2024) सुरु आहे. मालिकेतील पहिले दोन सामने झाले असून, तिसरी लढत उद्या म्हणजेच 24 सप्टेंबर रोजी, चेस्टर-ले-स्ट्रीट (Chester-le-Street) येथील हेरिवरसाइड ग्राउंड (Riverside Ground) वर दुपारी 03:30 वाजता सुरु होईल. कांगारुंनी पहिले दोन सामने आगोदरच खिशात घालून इंग्लंडच्या (AUS vs ENG) संघावर दबाव टाकला आहे. या मालिकेतील ऑस्ट्रेलिया 2-0 अशा मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे इंग्लंडला मालिकेवर दावेदारी सांगण्यासाठी निकराचे प्रयत्न करावे लागणार आहेत. तर मालिकाविजेता होण्यासाठी ऑस्ट्रेलियाला केवळ एका विजयाची आवश्यकता आहे.
ODI Series 2024 च्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंड 68 धावांनी पराभूत झाला. या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागल्याने आपली पत राखण्यासाठी का होईना, इंग्लंडला तिसऱ्या डावावर विजय मिळवावा लागणार आहे. या मालिकेत इंग्लंड पहिल्या डावात 7 विकेट्सनी पराभूत झाले तर दुसऱ्या डावात 68 धावांनी. (हेही वाचा,ENG vs AUS 2nd ODI Live Toss Update: दुसऱ्या वनडेत नाणेफेचा कौल इंग्लडच्या बाजुने, ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी केले आमंत्रित )
हेड टू हेड रिकार्ड्स(Head To Head Records): इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट जगतातील नेहमीच दमदार 'खिलाडी' राहिले आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची संख्या विचारात घेता उभय देशांनी 158 सामने खेळले आहेत. ज्यात ऑस्ट्रेलियाने 90 वेळा विजय मिळवला आहे. तर इंग्लंड केवळ 63 सामन्यांमध्ये यशस्वी कामगिरी करु शकला आहे. याशिवाय दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे दोन्ही संघातील सामना नेहमीच उत्कंटावर्धक राहिला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना 2024 महत्त्वाचे खेळाडू (Key Players): हैरी ब्रूक, लियाम लिविंगस्टोन, मिशेल मार्श, ट्रैविस हेड, कैमरून ग्रीन, मिशेल स्टार्क.
परस्परांना टक्कर देऊ शकणारे तगडे खेळाडू (Mini Battle): इंग्लंडचे जेमी स्मिथ (गोलंदाज) आणि मिशेल यांच्यातील टक्कर, ट्रैविस हेड आणि जोफ्रा आर्च यांच्यातील संघर्ष खेळावर मोठा प्रभाव टाकू शकतात.
या सामन्याचे लाईव्ह सट्रीमिंग कोठे आणि कसे पाहाल?
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीममध्ये हाणाऱ्या मालिकेचा तिसरा सामना आपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहू शकता. हेच प्रसारण आपण सोनी स्पोर्ट्स टेन 5 एसडी/एचडी वरही पाहू शकता. तसेच सोनी लिव(SonyLiv) आणि फैनकोड ऐप और वेबसाइट यांवरही आपण या सामन्यांचा आनंद घेऊ शकता.
दोन्ही देशांच्या क्रिकेट संघातील खेळाडू
इंग्लंड क्रिकेट टीम: फिलिप साल्ट, बेन डकेट, विल जैक्स, हैरी ब्रूक (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्ठीरक्षक), लियाम लिविंगस्टोन, जैकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, मैथ्यू पॉट्स, आदिल राशि.द
ट्रैविस हेड, मिशेल मार्श (कर्णधार), स्टीवन स्मिथ, कैमरून ग्रीन, मार्नस लाबुशेन, एलेक्स कैरी (यष्ठीरक्षक), मैथ्यू शॉर्ट, आरोन हार्डी, सीन एबॉट, बेन ड्वार्शिस, एडम जम्पा.