ENG vs AUS (Photo Credit - X)

England National Cricket Team vs Australia National Cricket Team: इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (Australia National Cricket Team) यांच्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना 27 सप्टेंबर रोजी म्हणजे आज खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना लंडनमधील लॉर्ड्सवर होणार आहे. इंग्लंडने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दमदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा 46 धावांनी पराभव केला. आता चौथा सामना जिंकून यजमान संघ मालिकेत 2-2 अशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघ मालिकेवर कब्जा करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. सध्या पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया 2-1 ने आघाडीवर आहे.

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा वनडे सामना किती वाजता होणार सुरू?

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा एकदिवसीय सामना 27 सप्टेंबर रोजी लंडनमधील लॉर्ड्स स्टेडियमवर खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. तर टॉसची वेळ अर्धा तास आधी असेल. (हे देखील वाचा: England vs Australia 4th ODI 2024 Pitch Report: लॉर्ड्सवर फलंदाज आपली जादू दाखवतील की गोलंदाज वर्चस्व गाजवतील, जाणून घ्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या वनडेचा खेळपट्टीचा रिपोर्ट)

कुठे पाहणार सामना?

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीममध्ये हाणाऱ्या मालिकेचा तिसरा सामना आपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहू शकता. हेच प्रसारण आपण सोनी स्पोर्ट्स टेन 5 एसडी/एचडी वरही पाहू शकता. तसेच सोनी लिव(SonyLiv) आणि फैनकोड ऐप और वेबसाइट यांवरही आपण या सामन्यांचा आनंद घेऊ शकता.

पाहा दोन्ही संघाचे खेळाडू

इंग्लंड एकदिवसीय संघ: हॅरी ब्रूक (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स (विकेट-कीपर), बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट (विकेट-कीपर), जेमी स्मिथ (विकेट-कीपर), ऑली स्टोन, रीस टोपली, जॉन टर्नर

ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ: मिचेल मार्श (कर्णधार), शॉन ॲबॉट, ॲलेक्स कॅरी (विकेट-कीपर), कूपर कोनोली, बेन द्वारशिस, कॅमेरॉन ग्रीन, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस (विकेट-कीपर), ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा