
England National Cricket Team vs Australia National Cricket Team : इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना कार्डिफ येथील सोफिया गार्डन्स येथे भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरु होईल. पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडचा 28 धावांनी पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर इंग्लंडला आता दुसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. इंग्लंडचा नियमित कर्णधार जोस बटलर दुखापतीमुळे या संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. जोस बटलरच्या अनुपस्थितीत फिलिप सॉल्ट संघाचे नेतृत्व करत आहे. तर ऑस्ट्रेलियाची कमान मिचेल मार्शच्या खांद्यावर आहे.
खेळपट्टीवर कोणाला मिळणार मदत?
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील दुसरा टी-20 सामना सोफिया गार्डन्स, कार्डिफ येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात गोलंदाज गोंधळ घालू शकतात. या मैदानावर फलंदाजांना चौकार-षटकार मारण्यासाठी थोडा संघर्ष करावा लागणार आहे. कार्डिफच्या सोफिया गार्डन्समध्ये आतापर्यंत एकूण 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या काळात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तीन सामने जिंकले आहेत. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने सात सामने जिंकले आहेत. येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 145 आहे. आजच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ 170-175 धावा करू शकतो.
दोन्ही संघांचे खेळाडू
इंग्लंडचा टी-20 संघ: (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रेडन कार्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, जोश हल, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब महमूद, डॅन मौसली, आदिल रशीद, जेमी ओव्हरटन, रीस टोपले, जॉन टर्नर.
ऑस्ट्रेलिया टी-20 संघ: मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), स्पेन्सर जॉन्सन, मार्कस स्टॉइनी, ॲडम झाम्पा