ENG vs AUS (Photo Credit - X)

England National Cricket Team vs Australia National Cricket Team : इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना कार्डिफ येथील सोफिया गार्डन्स येथे भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरु होईल. पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडचा 28 धावांनी पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर इंग्लंडला आता दुसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. इंग्लंडचा नियमित कर्णधार जोस बटलर दुखापतीमुळे या संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. जोस बटलरच्या अनुपस्थितीत फिलिप सॉल्ट संघाचे नेतृत्व करत आहे. तर ऑस्ट्रेलियाची कमान मिचेल मार्शच्या खांद्यावर आहे.

कधी अन् कुठे पाहणार सामना?

आम्ही तुम्हाला सांगतो की इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना भारतात टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कद्वारे सोनी स्पोर्ट्स टेन 5 एचडी आणि सोनी स्पोर्ट्स टेन 5 एचडी चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल. याशिवाय, सोनी लिव्ह आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. (हे देखील वाचा: ENG vs AUS 2nd T20I Head To Head Record: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जाणार दुसरा टी-20 सामना, त्याआधी आकडेवारीत पाहा कोण आहे वरचढ)

दोन्ही संघांचे खेळाडू

इंग्लंडचा टी-20 संघ: (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रेडन कार्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, जोश हल, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब महमूद, डॅन मौसली, आदिल रशीद, जेमी ओव्हरटन, रीस टोपले, जॉन टर्नर.

ऑस्ट्रेलिया टी-20 संघ: मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), स्पेन्सर जॉन्सन, मार्कस स्टॉइनी, ॲडम झाम्पा