ENG vs AUS (Photo Credit - X)

England National Cricket Team vs Australia National Cricket Team : इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील 2024 चा दुसरा सामना उद्या म्हणजेच 13 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. हा सामना कार्डिफ येथील सोफिया गार्डन्स येथे भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरु होईल. पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडचा 28 धावांनी पराभव केला आहे. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर इंग्लंडला आता दुसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे. इंग्लंडचा नियमित कर्णधार जोस बटलर दुखापतीमुळे या संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. जोस बटलरच्या अनुपस्थितीत फिलिप सॉल्ट संघाचे नेतृत्व करत आहे. तर ऑस्ट्रेलियाची कमान मिचेल मार्शच्या खांद्यावर आहे.

आकडेवारीत कोण आहे वरचढ

आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील स्पर्धा बरोबरीची होती. दोन्ही संघांमध्ये एकूण 25 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत ऑस्ट्रेलियन संघाने 12 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने 11 सामने जिंकले आहेत. दरम्यान, 2 सामनेही अनिर्णित राहिले आहेत. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 10 टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. या कालावधीत इंग्लंडने 5 मालिका जिंकल्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 2 जिंकल्या आहेत. याशिवाय 3 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.

हे देखील वाचा: ENG vs AUS 1st T20I 2024: 4,4,6,6,6,4... ट्रॅव्हिस हेडचा डोक्याला शाॅट, सॅम कुरनच्या एका षटकात ठोकल्या 30 धावा; पाहा व्हिडिओ

दोन्ही संघांचे खेळाडू

इंग्लंडचा टी-20 संघ: फिल सॉल्ट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रेडन कार्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, जोश हल, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब महमूद, डॅन मौसली, आदिल रशीद, जेमी ओव्हरटन, रीस टोपले, जॉन टर्नर

ऑस्ट्रेलिया टी-20 संघ: मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, कॅमेरॉन ग्रीन, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), स्पेन्सर जॉन्सन, मार्कस स्टॉइनीस, ॲडम झाम्पा.