इंग्लिश गोलंदाज गडी बाद झाल्यावर साजरा करताना (Photo Credits: Twitter)

England Tour of India 2021: कोविड-19 मुळे इंग्लंडच्या (England) दक्षिण आफ्रिका दौर्‍यावरील एकदिवसीय मालिका रद्द झाल्यानंतर आयसोलेशन प्रोटोकॉलची अत्यंत उच्च दर्जाची प्रक्रिया बहुतेक क्रिकेट बोर्डांना शक्य होईल का अशी चिंता व्यक्त केली जात आहे. आणि आता इंग्लंड संघ (England Tour of India) फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारत दौर्‍यावर येणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द झाल्यानंतर हा त्यांचा पहिला परदेश दौरा असेल. बीसीसीआयने (BCCI) गुरुवारी इंग्लंडच्या भारत दौर्‍याचे वेळापत्रक जाहीर केले. या मालिकेत चार कसोटी, पाच टी-20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळले जातील. सर्व सामने चेन्नई, अहमदाबाद आणि पुणे येथे खेळले जातील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आता खूपच उच्च-स्तरीय बायो-बबल आणि व्हॅक्यूम सीलबंद वातावरण तयार करावे लागणार असून ब्रिटनच्या कंपनी रेस्ट्राटाला हे काम करावे लागण्याची शक्यता आहे. (BCCI Announces The Schedule for England Series: भारत-इंग्लंड क्रिकेट मालिका, बिसीसीआयने जाहीर केले वेळापत्रक)

रीस्ट्राटा कंपनीने यापूर्वी यंदाच्या आयपीएलसाठी बायो सिक्योर बबल (बीएसई) तयार केले होते. क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) संघाचे डॉक्टर सुएब मांजरा यांनी म्हटले की इंग्लंडसारख्या संघांना आता परदेश दौरा करताना टेम्पर्ड मॉडेलचा अवलंब करावा लागेल आणि घरगुती मोसमात यशस्वी झालेल्या विस्तृत आणि महागड्या मॉडेलची त्यांना अपेक्षा करण्याची गरज नाही. मांजरा यांचे असे मत आहे की इंग्लंडने जे काही केले ते तुलनेने चांगले आहे कारण व्हॅक्यूम सीलबंद वातावरणात जास्त खर्च येत नाही. ते म्हणाले की, सकारात्मक आढळलेल्या खेळाडूंचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. आयपीएलमध्येही अशीच घटना घडली जिथे BSE उच्च स्तरीय असूनही काही खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी सकारात्मक आढळले होते परंतु असे असूनही, लीग आयोजित केली गेली आणि त्यानंतर कोणतेही सकारात्मक प्रकरण समोर आले नाही.

महागड्या बीएसईची पुनरावृत्ती 2021 मध्ये होणार नाही असे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) ऑक्टोबरमध्ये कबूल केले होते. यामुळे ECB ला 100 लाख डॉलर्सचे नुकसान झाले होते. 30,000 चाचण्यांची किंमत दहा लाख पौंड इतकी होती. दुसरीकडे, आयपीएल दरम्यान 20,000 टेस्ट्सवर एकट्या बीसीसीआयने 10 कोटी रुपये खर्च केले.