कोलकाता: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs ENG 1st T20I) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर (Eden Gardens, Kolkata) खेळला जात आहे. टी-20 मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या (Jos Buttler) खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) करत आहे. तत्तपुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाने भारतासमोर 133 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. (हे देखील वाचा: Arshdeep Singh New Record: अर्शदीप सिंगने रचला इतिहास, कोलकात्यात मोडीत काढला युजवेंद्र चहलचा विक्रम)
1ST T20I. WICKET! 19.6: Mark Wood 1(1) Run Out Sanju Samson, England 132 all out https://t.co/4jwTIC5zzs #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 22, 2025
इंग्लंडची वाईट सुरुवात
नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंड प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला आणि त्यांची सुरुवात निराशाजनक झाली कारण दोन्ही सलामीवीर केवळ 17 धावांवर बाद झाले. संपूर्ण इंग्लंड संघ निर्धारित 20 षटकांत 132 धावांवर ऑलआउट झाला. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने 68 धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान, जोस बटलरने 44 चेंडूत आठ चौकार आणि दोन षटकार मारले. जोस बटलर व्यतिरिक्त हॅरी ब्रुकने 17 धावा केल्या.
वरुण चक्रवर्तीने घेतल्या सर्वाधिक तीन विकेट
दुसरीकडे, अर्शदीप सिंगने टीम इंडियाला पहिले मोठे यश मिळवून दिले. टीम इंडियाकडून युवा स्टार गोलंदाज वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती व्यतिरिक्त, अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला 20 षटकांत 133 धावा कराव्या लागतील. हा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत आघाडी घेऊ इच्छिते.